“बोगस बोंब”चा फटका

0
1064

बोगस बोंब या लाकसत्तातील अग्रलेखानं केवळ शेतकऱ्यांचेच नुकसान झालंय असं नाही तर ‘पत्रकार संरक्षण कायदा’ आणि ‘पत्रकार निवृत्ती वेतना’च्या मागणीसाठी गेली सात-आठ वर्षे सुरू असलेल्या चळवळीलाही मोठा फटका बसल्याचे काल नागपुरात दिसून आलं.
पत्रकाराच्या विरोधात उघडपणे आणि संघटीतपणे लोकप्रतिनिधींनी आपला आवाज उठविल्याचे अपवादात्मक परिस्थितीतच घडलेले आहे.काल मात्र लोकसत्ताच्या अग्रलेखाच्या विरोधात सर्वपक्षीय खंबीरपणे एकत्र आल्याचे चित्र दिसले.पत्रकारांसाठी हे नक्कीच चांगले झालेले नाही.
लोकसत्ताच्या अग्रलेखाचंा वधानसभेत आणि सभागृहाबाहेर सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील अग्रलेखाचा निषेध केला. ‘शेतकऱ्यांची स्थिती माहित नसताना असे तारे तोडणे योग्य नाही,ही पत्रकारिता नव्हे’ असाही सूर सर्वच नेत्यांनी आळवला. पत्रकारांच्या विरोधात एकत्र यायला ,आणि पत्रकारांबद्दलचा आपला सनातन राग सामहिकरित्या व्यक्त करायला गिरीष कुबेर यांनी सर्वपक्षीय नेत्याना चांगलीच संधी दिल्याचे काल दिसून आले.जाहीरपणे कोणी बोलले नसले तरी काही आमदारांनी खाजगीत’ वंचित,उपेक्षित घटकांच्या विरोधात आपली लेखणी चालविणा़ऱ्या पत्रकारांसाठी संरक्षण कायदा कश्यासाठी करायचा?’ असा सवालही उपस्थित केला आहे.त्यामुळेच आजपर्यत पत्रकार सुरक्षा कायद्याला छुपा विरोध करणारे आता वेळ आली तर उघडपणे त्यास विरोध करू शकतात असे काही आमदारांशी बोलताना दिसून आले.त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांची कायदा आणि पेन्शनसाठीच्या चळवळीला मोठा सेटबॅक बसला आहे.गिरीष कुबेर यांनी पत्रकार संरक्षण कायद्याला नेहमीच विरोध केला आहे.तो होणार नाही अशी व्यवस्थाही त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात अग्रलेख लिहून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here