बुलढाणा : पत्रकार भवनास 25 लाख रूपये

0
733

स्व.भाऊसाहेबांनी दिलेल्या शब्दाला ना.कुटे यांनी दिले मुर्त रुप..
बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या भवनास २५ लाख

बुलडाणा : मराठी पत्रकार परिषद, मुंबईशी संलग्नीत बुलडाणा जिल्हा पत्रकार भवनाच्या विस्तारीकरण कामासाठी वैशिष्ट्यपुर्ण निधीतून २५ लाख रुपये निधीला मंजुरी दिली असल्याची घोषणा, नवनियुक्त पालकमंत्री ना.डॉ.संजय कुटे यांनी पत्रकार परिषदेत करताच पत्रकारांनी टाळ्यांच्या गजरात या घोषणेचे स्वागत केले. विशेष म्हणजे बुलडाणा येथे ना.भाऊसाहेब पुंâडकर यांनी २७ मे २०१७ रोजी घेतलेल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकार भवनाला निधी देण्याचे सुतोवाच केले होते, त्याला मुर्त रूप दिले श्री. कुटे यांनी!

१९९७ साली मराठी पत्रकार परिषदेच्या मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्याला पत्रकार भवन देवून त्यासाठी १० लाख रुपयांचा निधी तत्कालीन युती शासनाच्या काळात त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी यांनी दिला होता. यानुसार बुलडाणा जिल्हा पत्रकार भवनाचे बांधकाम पुर्ण करण्यात आले होते. त्यानंतर मे २०१८ला तत्कालीन पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी या पत्रकार भवनाच्या विस्तारीकरणासाठी २० लाख रुपये निधीचा प्रस्ताव वैशिष्ट्यपुर्ण निधीतून स्वाक्षरीनिशी जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी दिला होता. पण त्यानंतर भाऊसाहेबांचे निधन झाल्यामुळे ती मंजूरातच मागे पडली. तरी पत्रकारांनी भाऊसाहेबांची शेवटच्या इच्छेची जाणीव जिल्हा प्रशासनाला करुन देवून त्याचा पाठपुरावा सुरुच ठेवला.
नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात ना.डॉ.संजय कुटे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागून त्यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आल्याने पत्रकारांच्या निधीसंबंधीच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या, अन् त्याच अपेक्षांना मूर्त स्वरुप देवून ना.डॉ.संजय कुटे यांनी आज गुरुवार ११ जुलै रोजी जिल्हा नियोजन मंडळाच्या झालेल्या बै’कीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा पत्रकार भवनास २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेचे सर्वच पत्रकारांनी स्वागत केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here