पत्रकार भवनाचे काम प्रगतिपथावर 

सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाचे काम प्रगतीपथावर असून मी आज दिनांक 9 जानेवारी 2020 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विनायक जोशी यांची भेट घेऊन चर्चा केली या इमारतीचे सिविल वर्क 31 मार्चपूर्वी पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून अधिकारी व ठेकेदाराने प्लॅनिंग केले आहे हे काम तो पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला आहे सिव्हिल वर्क पूर्ण होतानाच विद्युतीकरणाचे कामही पूर्ण करावे लागणार आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने विद्युत विभागाला आदेश देऊन या कामाचे अंदाजपत्रक बनविण्यास सांगितले आहे अंदाजपत्रक पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक मान्यता घेण्यात येणार आहे मात्र सिविल वर्क पूर्ण झाल्याशिवाय फर्निचर चे काम सुरू करता येणार नाही तसेच त्या कामाचे अंदाजपत्रक करता येणार नाही कारण सिविल वर्क पूर्ण झाल्याशिवाय फर्निचर ची मापे घेता येत नाही फर्निचर ची मापे एप्रिल महिन्यात घेऊन तांत्रिक मान्यता घेऊन  अत्यावश्यक फर्निचरचे काम पूर्ण करून एस एम देशमुख सर किरण नाईक साहेब आणि गजानन नाईक साहेब यांच्या सूचनेनुसार मे महिन्यात पत्रकार भवनाचे उद्घाटन करता येते का याचा प्रयत्न करण्यात येणार आहे याचा या भवनातील पुतळ्याचे काम पूर्ण करणे हा महत्त्वाचा विषय आहे पुतळ्याचे काम शासनाच्या नियमानुसार अंदाजपत्रकात घेता येत नाही त्यामुळे तो देणगीतून करावा लागणार आहे परंतु त्याची परवानगी महाराष्ट्र शासनाच्या कला संचनालय कडून मिळवावी लागणार आहे या परवानगीसाठी चा प्रस्ताव कोणी व कसा करायचा याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन  घ्यावा लागणार आहे त्यामुळे नाईक साहेब यांची वेळ घेऊन लवकर जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व सदस्यांना सोबत घेवून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार आहे या भेटीत काय ठरेल याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला निश्चितपणे कळवू आपल्या काही सूचना असल्यास कृपया सांगाव्यात असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY