मांडणी,लक्षवेधक मथळे

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे वृत्तपत्रांसाठी सत्वपरीक्षा असते.प्रभावी मथळ्यापासून आकर्षक मांडणीपर्यंत अनेक गोष्टींकडं अर्थसंकल्प वाचकांसमोर सादर करताना व्यवधान ठेवावे लागते.मोठ्या दैनिकांत तर बजेटची तयारी पंधरा-पंधरा दिवस अगोदर सुरू असते.या वार्षिक परीक्षेत कोणती वृत्तपत्रे उत्तीर्ण झाली,कोणती वृत्तपत्रे पहिल्या क्रमांकानं पास झाली हे पाहणं महत्वाचं असतं.यंदाचा भाजप सरकारचा अर्थसंकल्प वाचकांसमोर सादर करताना देखील वृत्तपत्रांचा कस लागलेला दिसतो आहे.बहुतेक वृत्तपत्रांची छान मांडणी केलेली आहे.शिर्षकही आकर्षक आहेत.मजकूरही भरभरून दिलेला आहे.सर्वच वृत्तपत्रांनी आज स्वाभाविकपणे बजेटवर अग्रलेखही लिहिले आहेत.बघा कोणत्या वृत्तपत्रांनी काय शिर्षक दिलंय ते..
महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीला आरोग्यम् कृषीसंपदा असे शिर्षक देऊन बातमी सजविली आहे.योगायोग असा की,सकाळचंही शिर्षक आरोग्यम् कृषीसंपदा असंच आहे.सामनानं ग्रामदेवता प्रसन्न असं शिर्षक देऊन ग्रामीण जनतेला खूष कऱणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सूचित केलं आहे.तेच ते आणि तेच ते या मथळ्याखाली सामनानं अग्रलेखही लिहिला आहे.पुढारीनं निवडणुकांची नांदी,शेतकरी,गरिबांची चांदी असा मथळा आपल्या बातमीला दिला आहे.लोकसत्तानं गावचं भलं तर आमचं चांगभलं अशा मथळा देऊन बातमी सजविली आहे.लोकमतनं खुल जा–2019 असा राजकीय मथळा देऊन ही 2019 च्या निवडणुकांची तयारी असल्याचे सूचित केलं आहे.हिंदुस्थान टाइम्सनं 18 Going on 19  असा मथळा दिलाय.तर टाइम्स ऑफ इंडियानं It all adds up to 2019 असं म्हटलं आहे.इंडियन एक्स्प्रेसनं Economic with pollitics  या मथळ्याखाली बातमी सजविली आहे.बहुतेक मथळे बघितले तर हा निवडणुकांवर डोळा ठेऊन सादर केलेला अर्थसंकल्प असल्याचेच सूचित करतात.बहुतेक वृत्तपत्रांची मांडणी आकर्षक आहे आणि मथळेही लक्षवेधक ठरले आहेत.सर्वांचे अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here