पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात मिडियाच्या वाट्याला फार क ाही आलेले नाही.माध्यमांशी संबंधित घटकांबद्दल अरूण जेटली कोणत्या तरतुदी केल्यात ते बघा.दरवर्षी कोटयवधींची उलाढाल कऱणाऱ्या आणि हजारो लाोकांना रोजगार देणाऱ्या माध्यम क्षेत्रासाठी सरकारने कोणतीही भरिव तरतूद केलेली नाही.प्रकाश जावडेकर यांनी निवृत्त पत्रकारांना पेन्शन योजना लागू कऱण्याचे सुतोवाच केलेले असले तरी त्याचा उल्लेख जेठली याच्या बेजेटमध्ये नाही.

1) शेतकऱ्यांसाठी किसान डीडी ही नवीन वाहिनी सुरू कऱण्याची घोषणा.त्यासाठी 100 कोटींची तरतूद
2) कम्युनिटी रेडियोला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटींची तरतूद.देशात नवे 600कम्युनिटी रेडियो स्टेशन उघडणार
3)ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हीटी वाढविण्यासाठी डिजिटल इंडिया कार्यक्रमासाठी 500 कोटी रूपये
4) पुर्वोत्तर राज्यांसाठी अरूण प्रभा नावाचे नवे टीव्ही चॅनल सुरू कऱणार
5)पुण्यातील भारतीय फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन सस्था आणि कलकत्ता येथील सत्यजीत राय इन्स्टिट्यूटला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देणार
6)ऑनलाईन आणि मोबाईल मिडियावरील जाहिरातीसाठी सेवा कर लागू
7) प्रिन्ट मिडियातील जाहिरातीच्या जागेच्या विर्कीवरील सेवा कर रद्द

LEAVE A REPLY