अफगाणीस्थानमध्ये असोसिएटस प्रेसच्या दोन महिला पत्रकारांवरील हल्ल्याला 48 तासही उलटले नसतानाच फिलिपाईन्समध्ये एका महिला पत्रकाराची हत्त्या करण्यात आल्यीती बातमी आहे.केव्हिएट प्रांताच्या बॅकोर शहरात ही घटना घडली.रूबीलिटा गार्सिय असे या 52 वर्षीय़ महिला पत्रकाराचे नाव आहे.रूबिलिटाला तिची दहा वर्षांची नात आणि अन्य कुटुबियासमोर अत्यंत कूरपणे ठार करण्यात आलं.रूबिलिटा एका टॅबालाईट वर्तमानपत्रासाठी काम करीत होती.

फिलिपाईन्समधील विद्यमान सरकारच्या काळात पत्रकाराच्या हत्तयेची ही विसावी घटना असून 1986 पासून आतापर्यत 160 पत्रकार मारले गेले आहेत.नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टने ही माहिती दिली आहे.सकाळी दहा वाजता हे मारेकरी पत्रकाराच्या घरात घुसले.आम्ही इतरांनी काही इजा करणार नाही असं त्यांनी जाहिर केलं आणि रूबिलाटावर चार गोळ्या झाडल्या.त्यांना लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आलं पण नंतर तेथे त्यंाचं निधन झालं.

LEAVE A REPLY