दैनिकांच्या कार्यालयांवर हल्ले

0
875

कोणती बातमी छापायची किंवा नाही हा अधिकार पूर्णपणे पत्रकारांचा आहे.मानगुटीवर बसून कोणीही बातमी छापून आणू शकत नाही.हे वास्तव विसरून आज हिंदूस्थान प्रजा पक्षच्या काही गुंडांनी फलटणमध्ये सकाळ आणि ऐक्यच्या कार्यालयावर हल्ला करून तेथील साहित्याची मोडतोड केली.कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आणि पंधरा -वीस मिनिटे तिथं धुडगू स घातला.

काही दिवसांपूर्वी फलटण येथील पोलिस कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाला होता.हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला होता.मृत्यू ह्रदयक्रिया बंद पडून झाला असं पोलिस सांगत होते.या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी फलटणमध्ये मोर्चाही निघाला होता.त्यानंतर वारे नावाच्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई केली .एका विशिष्ट समाजाच्या दबावामुळेच ही कारवाई केली गेली असा आक्षेप हिंदुस्थान प्रजा पक्षाने घेतला होता.त्या संबंधीचे एक पत्रक त्यांनी काढले होते.त्या पत्रकावरून काही दैनिकांनी बातम्या दिल्या काहींनी दिल्या नाहीत.त्यानंतर काल हिंदुस्थान प्रजा पक्षानं एक पत्रकार परिषदही
ठेवली होती.तेथेही काही पत्रकार गेले होते.
हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या पत्रकावरून आजच्या ऐक्यमध्ये बातमी आलेली होती.तरीही आमच्या बातम्या दिल्या नाहीत हे म्हणून हिंदुस्थान प्रजा पक्षांच्या गुंडांनी आज लक्ष्मीनगर भागातील ेऐक्य आणि सकाळच्या कार्यालायवर हल्ला करून मोठी मोडतोड केली आहे.या घटनेची तक्रार पोलिसात देण्यात येत आहे.
सातारा जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक सुजित अंबेकर आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी या घटनेचा निषेध केला असून हे प्रकरण आर.आर.पाटील यांच्या कानावर घालण्यात आलं आहे.हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी एस.एम.देशमुख यांनी केली आहे.एकाच वेळेी एकाच शङरातील दोन दैनिकांच्या कार्यालयावर हल्ला होण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here