प्रफुल्ल पवारची नवी इनिंग…

0
751

अलिबाग येथील एक तरूण पत्रकार प्रफुल्ल पवार यांची झी-24 तासचे रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.प्रफुल्ल गेली दहा-पंधरा वर्षे प्रिन्ट मिडियातीत कार्यरत होता. विविध दैनिकांसाटी रायगडमधून काम करणाऱ्या प्रफुल्लनं आता इलेक्टॉनिक मिडियात पदार्पण केलेलं आहे.प्रफुल्लला त्याच्या या नव्या इनिंगसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
नांदवीसारख्या एका छोट्या खेड्यातून आणि सामांन्य कुटुंबातून आलेल्या प्रफुल्लनं अलिबागेत येऊन पत्रकारितेत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.पत्रकारितेत काम करताना प्रफुल्लच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण त्यांनं यासर्वावर मात करीत आपली वाटचाल निर्धारानं सुरू ठेवली.हे करताना आपल्या स्वाभिमानालाही कधी तडा जाऊ दिला नाही.कमालीचा न्यूज सेन्स,दांडगा जनसंपर्क,सतत बातमी हाच विषय डोक्यात घेऊन पत्रकारिता करणाऱ्या प्रफुल्लनं अनेक चांगल्या बातम्या दिलेल्या आहेत.अनेकदा त्याच्या बातम्या जिल्हयात चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत.अलिबाग प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून पत्रकारांच्या संघटनेतही प्रफुल्लनं चांगला काम केलं आहे.प्रफुल्लच्या अध्यक्षपदाच्या काळात प्रेस असोसिएशननं शहरात विविध उपक्रम राबविले .एक धडपड्या,पत्रकारितेवर जीवापाड प्रेम करणारा,अलिबागच्या प्रश्नांची जाणीव असणारा,शेतकरी,सामांन्य माणूस,आणि उपेक्षितांबद्दल कमालीची कणव असणारा ,आणि सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार म्हणून रायगड प्रफुल्लला आोळखतो.आम्ही थोडे दिवस का होईना एकत्र काम केलेले असल्यानं प्रफुल्लला झी-24तासची रायगडची जबाबदारी मिळाल्याचं वाचून मनस्वी आनंद झाला .मला खात्रीय की,प्रफुल्लची नवी कारकीर्द यशस्वी ठरेल आणि रायगडमधील स्टार पत्रकार म्हणून प्रफुल्लचा नावलौकीक वाढेल ..प्रफुल्लचं अभिनंदन आणि परत एकदा शुभेच्छा. ( SM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here