पुन्हा एकदा पुण्यप्रसून वाजपेयी..

सत्ता आणि सत्ताधारी पक्षानं गोल्ड बिस्किट कंपनीचे मालक बी. पी. अग्रवाल यांच्यासमोर दोन पयाॅय ठेवले होते.. पहिला होता विविध एजन्सीच्या चौकश्याना सामोरं जाणं किंवा दुसरा पुण्यप्रसून वाजपेयी यांना घरचा रस्ता दाखविणे. शेवटी अग्रवाल शेठनी सोपा आणि दुसरा मार्ग निवडला.. काही दिवसांपूर्वीच सूर्या समाचार या हिंदी वाहिनीत रुजू झालेल्या पुण्यप्रसून वाजपेयी आणि टीमला घरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतला. ३१ मार्च हा पूण्यप्रसून वाजपेयी यांचा सूर्या समाचार मधील शेवटचा दिवस असेल. पूण्यप्रसून वाजपेयी यांनी यावर प्रतिक्रिया देताना २५० कोटींची ढील, जय हिंद एवढंच भाष्य केलं आहे..
व्यवस्थेने पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा सोपा आणि सरळ मार्ग शोधला आहे.. मिडिया मालकांवर दबाव आणा, त्यांच्या अन्य व्यवसायाच्या चौकश्या करण्याच्या धमक्या द्या आणि आपल्याला हवं ते त्यांच्याकडून करवून घ्या.. सत्तेच्या या नीतीचे अनेक पत्रकार बळी ठरले आहेत.. एकीकडं पत्रकारांनी नि:पक्ष, निर्भिड पत्रकारिता करावी अशी अपेक्षा करायची आणि त्याच वेळेस अशा पत्रकारांचा विविध पध्दतीनं आवाज बंद करण्याचा प्रयत्न करायचा.. गंमत अशी असते की, माध्यमांनी विरोधी पक्ष्याची भूमिका पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त करणारा समाज देखील जेव्हा एखादा पूण्यप्रसून प्रवाहांच्या विरोधात जाऊन, सत्याची कास धरत असत्य उजागर करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा समाज देखील साथ देत नाही.. समाजाचं हे मौन व्यवस्थेला मनमानी करण्यास सहाय्यभूत ठरत असते..पुण्यप्रसून असोत अथवा अन्य कोणी पत्रकार ते जेव्हा व्यवस्थेवर प्रहार करतात तेव्हा ही लढाई त्यांच्या एकट्याची लढाई असत नाही.. व्यवस्था विरूध्द समाज अशी ही लढाई असते तरी देखील बळी जातो तो पत्रकाराचा.. दु:ख याचं वाटतं की, अशा स्थितीतही समाजाला शोक करायला देखील फुरसद असत नाही.. सरकार आणि सत्ताधारी भाजपशी वाजपेयींचे व्यक्तीगत काय वैर असू शकते.. सरकारच्या निषकंीयतेवर अथवा अपयशावर प़हार करणे हे पत्रकारांचे कामच असते हे काम कोणी प्रामाणिकपणे करू लागला की तो आपोआप सत्तेचा शत्रू होतो आणि मग सुरू होते.. सत्ता विरूध्द पत्रकार अशी विषम लढाई.. सत्तेला एखाद्या पूण्यप्रसून वाजपेयी, एखादा निखिल वागळे अधवा एखादा एस.एम.देशमुखला रस्त्यावर आणणे अवघड नसले तरी सत्ता त्यांचा आवाज बंद करू शकतेच असं होत नाही.. सारा मिडिया आज भांडवलदारी मालकांच्या हाती गेल्याने अनेक पत्रकार डिजिटल मिडियाच्या माधयमातून जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एखादा पत्रकार जेव्हा लयसरकारचया हिटलिस्टवर येतो तेव्हा त्याचे मानसिक, आर्थिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जोरदारपणे केला जातो.. त्याला कोणत्याही माध्यमात काम मिळणार नाही याची व्यवस्था केली जाते…हे सारं संपवायचं असेल तर लाचार भांडवलदारी मालकांना वठणीवर आणावे लागेल. या मालकांना कधी चौकशयांचया धमक्या देत तरी कधी विविध शासकीय कमिटयांचे तुकडे त्यांच्यासमोर टाकून त्यांना मिंधे केले जाते.. अलिकडे महाराष्ट्रातील काही मराठी वृत्तपत्रांच्या मालकांना विविध कमिटयावर घेऊन त्यांना मंत्री, राज्यमंत्र्यांचे दर्जा बहाल केले आहेत. हा माध्यमांना मिंधे करण्याचा प्रकार आहे.. हे सारं होत असलं तरी सारा मिडिया गोदी मिडिया कधीच होणार नाही हे नक्की.. व्यवस्थेच्या विरोधात एखादा रविशकुमार, एखादा पूण्यप्रसून, एखादा निखिल वागळे बोलतच राहणार आहे.. कारण सारेच विकावू नाहीत हे सत्तेने लक्ष्यात असू द्यावे.. आम्ही पूण्यप्रसून वाजपेयींसोबत आहोत..
एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here