पिंपरी(प्रतिनिधी)
मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन यशस्वी केल्याने पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे नाव राज्यातील पत्रकार आदराने घेत असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख यांनी काल पिंपरीत दिली.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाची सन् 2016-18 साठी निवडलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार एस एम देशमुख यांच्या हस्ते काल मंगळवारी कै.भा वि कांबळे पत्रकार कक्षात घेण्यात आला.यावेळी देशमुख बोलत होते.यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे,सरचिटणीस प्रभाकर क्षीरसागर,पुणे शहर सचिव सुनील वाळुंज,माजी अध्यक्ष,बाळासाहेब ढसाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बापूसाहेब गोरे,प्रभाकर क्षीरसागर यांची भाषणे झाली.
यावेळी नवनियुक्त अध्यक्षा सायली कुलकर्णी,कार्याध्यक्ष गणेश हुंबे,संघाचे समन्वयक अनिल वडघुले,उपाध्यक्ष विश्वास शिंदे,संजय बोरा,सरचिटणीस अजय कुलकर्णी,सहचिटणीस सुनील फुगे,दत्तात्रय कांबळे,हिशोब तपासणीस रूपा शेट्टी,खजिनदार दादा आढाव,कार्यकारिणी सदस्य,विलास रानडे,संदीप तापकीर, बाळासाहेब शिंदे,रामकृष्ण पालमकर,सीताराम मोरे यांचा सत्कार करण्यात आला.सर्वांचे स्वागत अध्यक्षा सायली कुलकर्णी यांनी केले तर आभार अनिल वडघुुले यांनी मानले.