प्रेम आपलेपणा,जिव्हाळा याचा प्रत्यय आणून देणारा कार्यक्रम काल पाटणमध्ये झाला.पाटण तालुका मराठी पत्रकार संघांचा हा कार्यक्रम होता.अत्यंत आपलेपणानं या मंडळींनी मी आणि किरण नाईक यांचा सत्कार केला.पाऊस कोसळत असतानाही पत्रकार, त्यांचे कुटुंबिय मोठया संख्येनं उपस्थित होते.पाटण तालुका मराठी पत्रकार संघ हा सातारा जिल्हयातील एक क्रियाशील पत्रकार संघ आहे.दुर्गम भाग असला तरी वैचारिकदृष्टया सक्षम आणि जागरूक असा हा परिसर आहे.पत्रकारांमधील एकोपा अणि जिव्हाळाही वाखाणण्याजोगा आहे.राज्यात असे अनेक तालुका पत्रकार संघ आहेत.त्यांना बळ देण्याची गरज आहे.मराठी पत्रकार परिषद पुढील काळात त्यादृष्टीनं आपल्या घटनेत बदल करीत आहे.कालच्या कार्यक्रमास परिषदेचे विभागीय चिटणीस शरद पाबळे,जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे,परिषदेचे सोशल मिडिया सेलचा सदस्य शरद काटकर,सातारा जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दीपक प्रभावळकर,पुणे शहर चिटणीस सुनील वाळूंज उपस्थित होते.तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार आणि त्यांच्या सर्व सहकर्‍यांना मनापासून धन्यवाद त्यांनी एक छान कार्यक्रम करून आमच्यावरचं प्रेम व्यक्त केलं..-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here