“स्थीर सरकारसाठी भाजपला पाठिंबा दिला” म्हणणारे शरद पवार यांनी आठ दिवसातच सरकार अस्थिर करणारे वक्तव्य अलिाबागमध्ये केले आहे.”आपण सरकार टिकविण्याचा मक्ता घेतलेला नाही” असे सांगून सरकारचा टेकू आपण कधीही काढून घेऊ शकतो हे दाखविले आहे.चर्चा आता अशी सुरूय की,पवार असे का बोलले? तीन कारणं आहेत,राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्रवादीतील अनेकजण नाराज आहेत.ही नाराजी आता व्यक्त होऊ लागली आहे.त्याचा फटका पक्षाला बसण्यापुर्वीच पवारांनी घुमजाव करीत साऱ्यांनाच धक्का दिला आहे.दुसरं कारण असंही आहे की,सरसंघचालकांच्या मध्यस्थीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती होऊन सेना सरकारमध्ये जावू शकते हे देखील पवारांच्या लक्षात आलेलं आहे.तसं झाल्यास राष्ट्रवादी संदर्भहिन होऊ शकते.म्हणून पवार हात झटकून मोकळे  होण्याचा प्रय़त्न करीत आहेत.विश्वास दर्शक ठरावाच्या वेळेस आपण तटस्थ होते हे आठ दिवसांनंतर सांगण्यामागंही जातीयवाद्यांच्या आण्ही कधी जवळ गेलोच नव्हतो असा आभास कऱण्याचा प्रय़त्न दिसतो.तिसरी वदंता अशीही आहे की,पवारांनी प्रय़त्न करून देखील त्यांच्या पक्षाला दिल्लीत किंवा राज्यात सत्तेत सहभागी करून घेण्याची भाजपची मानसिकता नाही.अशा स्थितीत हे लोढणं गळ्यात अडकवून घेण्यापेक्षा भाजपपासून पुन्हा चार हात दूर व्हायचा प्रय़त्न शरद पवारांनी केलाय भाजपपासून दूर जाऊन पुन्हा आंबेडकर,शाहू ,फुलेंचं नाव घ्यायला पवारांना मोकळं व्हायचंय

पवारांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने लगेच प्रतिक्रिया देण्याची मात्र निष्कारण घाई केली.भाजप सरकार अस्थिर होऊ देणार नाही असं संजय राऊतांनी जाहीर केलंय.मला वाटतं शिवसेनेनं थोडी वाट बघायला हवी.भाजप सरकार टिकविण्यासाठी शिवसेना उताविळ आहे हा संदेश सेनेसाठी नक्कीच चांगला नाही.आजपर्यत सेनेला मिळत असलेली सहानुभूती या वक्तव्यानं संपुष्टात येऊ शकते.

LEAVE A REPLY