अजितदादा पवार यांनी मतदारांना धमकी दिली.ते म्हणाले,
उद्याच्याला कुणी काही जरी गडबड केली तरी सुप्रियाला मी बाहेरच्याकडून निवडून आणेन. पण जर तुमच्या गावाने शब्द फिरवला तर इथलं पाणी सगळं मी बंद करेन. मी तुम्हाला आताच सांगतो..जर मासाळवाडी किंवा कुणी..तर मला मशीनमध्ये दिसेल, मी सरळ त्या लोकांना सांगेन की जर तुम्हाला अशी मस्ती आली तर मला तरी काय घेणं देणं आहे? शेवटी एका गावावरून माझी बहीण पडायची राहत नाही किंवा निवडून यायची राहत नाही.
अजित पवारांनी ही धमकी दिल्यानंतर आपचे उमेदवार सुरेश खोपडे आणि महायुतीचे महादेव जानकर यांनी पोलिसात याची तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी अजून गुन्हा दाखल केलेला नाही.
याबाबतची प्रतिक्रिया शरद पवारांना विचारली असता ते पत्रकारावरच भडकले.अजित पवार यांच्यावरील आरोप खोटे आहेत असं त्यानी स्पष्ट केलं.अजित पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल झालीय ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर ते आणखीनच भडकले.तुम्हाला मराठीत सांगितलेलं कळतंय ना असं चिडून ते पत्रकारांना बोलले.