मराठी पत्रकार परिषदेच्या 2 फेब्रुवारी रोजी एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले गेले आहेत.त्यातील काही निर्णय असे.
1) मराठी पत्रकार परिषदेचे संघटन अधिक मजबूत आणि भक्कम करण्यासाठी जिल्हा स्तरीय अधिवेशन घेणे.परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन दर दोन वर्षांनी होत असते.मात्र यापुढे प्रत्येक जिल्हयाने जिल्हा स्तरावर अधिवेशन घ्यावे असा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार पुणे जिल्हा पत्रकार संघाचे पहिले अधिवेसन 27 मार्च रोजी घेण्याचे नक्की झाले आहे.रायगड जिल्हयात हे अधिवेशन 24 मार्च रोजी होत आहे.
2) जाहिरात धोरण समिती- छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांवर जाहिरात धोरणात नेहमीच अन्याय केला गेला आहे.त्यमुळे दरवाढ आणि अन्य जाहिरात विषयक गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली आहे.ही समिती जाहिरात विषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
3) मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या आरोग्य सेवा कक्ष अधिक परिणामकारक आणि व्यापक कऱण्यासाठी प्रयत्न कणर्यात येणार आहे.
4) कायदा आणि पेन्शनः परिषदेने हाती घेतलेले पत्रकार कायदा आणि पेन्शनसाठी लढा अधिक व्यापक कऱण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार एस.एम.देशमुख यांना देण्यात आला आहे.
5) जिल्हा संघाच्या निवडणुका यापुढे बॅलेट पेपरव्दारेच घेण्याचे नक्की करण्यात आले आहे.तसेच जिल्हा आणि तालुका संघांना परिषद एक मॉडेल घटना तयार करून देणार आहे.तीच घटना धर्मदाय आयुक्तांकडे सादर करण्याचेही नक्की झाले आहे.
6) ठाणे जिल्हा पत्रकार संघानं पुरस्कार वितरण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हा संघाचं अभिनंदन करणारा ठराव यावेळी संमत करण्यात आला.
7)मुंबई संघानं बळकाविलेल्या परिषदेच्या जागेच्या वादावर चर्चा करून काही निर्णय घेतले गेले.
8) रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.तेथील निवडणुकांची प्रक्रिया 10 तारखेपासून सुरू होत आहे.
9) परिषदेचा कार्याची दैनंदिन माहिती राज्यातील पत्रकारांना व्हावी यासाठी परिषदेची एक वेबसाईट लवकरच सुरू कऱण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
10) मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर एस.एम.देशमुख यांची एकमताने निवड
11) परिषदेला आर्थिख स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा संघाने परिषदेला प्रत्येकी 10 हजार रूपयांची देणगी देण्याचे यावेळी उपस्थित सर्वच जिल्हा संघांनी मान्य केले.तसेच थकित वर्गणी देखील देण्याची मान्य केले.
12) परिषदेच्या रिक्त जागा भरण्याचे अधिकार किरण नाईक,सिध्दार्थ शर्मा,यशवंत पवार आणि मिलिंद अष्टीवकर यांना देण्यात आले.