अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवनेरी आणि शिवशाहीसाठी 

सवलत देण्याची मराठी पत्रकार परिषदेची मागणी 

मुंबईः प्रतिनिधी अधिस्वीकृतीधार पत्रकारांना शिवशाही आणि शिवनेरीमधून मोफत  प्रवासाची सवलत देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिल्याने गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेली ही मागणी मार्गी लागण्याची शक्यता आहे.

एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने आज दिवाकर रावते यांची त्यांच्या मुबईतील निवासस्थानी भेट घेउन या विषयावर सविस्तर चर्चा केली.

प्रारंभी दिवाकर रावते यांच्या हस्ते मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने प्रसिध्द कऱण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे प्रकाशन कऱण्यात आले. एस,एम,देशमुख यांनी लिहिलेले संघर्षाची पंच्च्याहत्तरी आणि कथा एका संघर्षाची ही दोन पुस्तके दिवाकर रावते यांना भेट देण्यात आली.

परिषदेची मागणी मांडताना एस.एम.देशमुख म्हणाले की,शिवशाही आल्यानंतर अनेक मार्गांवरील एशियाड तसेच हिरकणी गाडया बंद झालेल्या आहेत किंवा त्यांच्या फेर्‍या नगण्य झाल्या आहेत.या गाड्यातून अधिस्वीकृधारक पत्रकारांना मोफत प्रवासाची सवलत दिली जाते.मात्र या गाडयाच बंद झाल्याने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची मोठीच गैरसोय होत आहे.सवलतीचा लाभही त्याना मिळत नाही.

त्यामुळे  शिवशाही आणि शिवनेरीमधून मोफत प्रवासाची सवलत मिळावी असा आग्रह धरला गेला.त्याच बरोबर एस.टी.महामंडळाच्या ज्या गाडया बाहेरच्या राज्यात जातात त्यानाही शेवटच्या टप्प्यापर्यंत सवलत दिली जावी अशीही मागणी केली.तसेच  पत्रकारांसाठी जी राखीव आसणं असतात त्याचं रिझर्व्हेशन इतरांना दिले जाऊ नये अशी विनंतीही दिवाकर रावते यांच्याकडे केली असून या सर्व मागण्यांबद्दल दिवाकर रावते यानी सहानुभूतीने विचार करण्याचे आश्‍वासन दिले.

परिषदेच्या या शिष्टमंडळात विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन,कोषाध्यक्ष शरद पाबळे,विभागीय सचिव विजय जोशी,माजी सरचिटणीस यशवंत पवार ,नाशिकचे परिषद प्रतिनिधी विजय बोराडे आदिंचा समावेश होता.

S.M Deshmukh (smdeshmukh13@gmail.com)

LEAVE A REPLY