63 वृत्तपत्रांना दरवाढ,113 वृत्तपत्रे नव्याने जाहिरात यादीत,
मराठी पत्रकार परिषदेच्या लढ्याचे आणखी एक यश
छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांच्या जाहिरात धोरणात वाढ करावी आणि ज्या वृत्तपत्रांना सरकारी जाहिराती दिल्या जात नाहीत त्यांचा जाहिरात यादीत समावेश करावा या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषदेने 25 एप्रिल 2016 रोजी राज्यभर एक दिवसाचे आंदोलन केले होते.जिल्हा माहिती कार्यालयासमोर राज्यभर निदर्शने करून पत्रकारांनी आपला संताप व्यक्त केला होता.या आंदोलनास राज्यभर पत्रकारांचा मोठाच प्रतिसाद मिळाला होता.सरकारने अखेर परिषदेच्या या आंदोलनाची दखल घेतली असून परिषदेच्या दोन्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत.सरकारे 18 जून 2016 रोजी या संबंधीचा जीआर काढला आहे.( शासन निर्णय ः पियूबी-2016/प्र.क्र.57/34 दिनांक 18 जून 2016 ) त्यानुसार सरकारच्या जाहिरात यादीत नव्याने 113 वृत्तपत्रांचा समावेश केला गेला असून त्यात साप्ताहिक आणि छोटया दैनिकांची संख्या सर्वाधिक आहे.तसेच दरवाढीची मागणी देखील अशतः का होईना सरकारने मान्य केली असून 63 वृत्तपत्रांच्या दरात वाढ कऱण्यात आली आहे.केवळ 63 वृत्तपत्रांनाच नव्हे तर सरसकट शंभर टक्के दरवाढ करावी अशी परिषदेची मागणी असून त्यासाठी मराठी पत्रकार परिषद यापुढेही पाठपुरावा करीत राहिल.25 एप्रिलच्या लढ्यात ज्या पत्रकारांनी योगदान दिले त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.आपण दाखविलेल्या एकजुटीमुळेच सरकारला हा निर्णय ध्यावा लागला आहे. —