स्वातंत्र्य सैनिकाच्या वयोवृद्ध विधवा पत्नीपार्वतीबाई मुळे यांना मराठी पत्रकार परिषदेची11,000 रूपयांची मदत

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची संघटना आहे.. चौथ्या स्तंभाच्या हक्काचं रक्षण करणे, गरजू पत्रकारांना आर्थिक मदत करणे आदि कामं परिषद करते.. परिषदेच्या मार्फत गेल्या दोन वर्षात पत्रकारांना जवळपास ५५ लाखांची मदत करण्यात आली आहे.. एका विशिष्ट वर्गाची ही संस्था असल्याने त्या वर्गासाठी काम करणे हे परिषदेचे ध्येय असले तरी अनेकदा आपल्या कारयक्षेत्राबाहेरच्या लोकांना देखील परिषदेने मदत केलेली आहे.. माजलगाव येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नी ़श्रीमती पार्वतीबाई शंकरराव मुळे यांच्या कुटुंबाची झालेली वाताहत आणि सध्या त्यांची सुरू असलेली परवड वाचून आणि पाहून मन व्यथित झाले.. कुटुंबात 88 वर्षांच्या पार्वतीबाई आणि 60 वर्षाची त्यांची विधवा मुलगी यांच्या शिवाय कोणीच नाही.. स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिळणारया पेन्शनवर त्यांची कशी तरी उपजिविका सुरू असतानाच पार्वतीबाई पडल्या.. मांडीचे हाड मोडले.. दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली.. त्यांच्याकडे ना सरकारचे लक्ष, ना समाजाचे, ना नातेवाईकांचे.. एकाकी माय-लेकिंना काही मदत करावी अशी विनंती माजलगावच्या पत्रकारांनी परिषदेला केल्यामुळे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मुळे माय-लेकिंना 11,000 रूपयांची मदत देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी केली आहे.. ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.. पार्वतीबाई मुळे यांची व्यथा समोर आल्यानंतर अनेकांनी मदत देण्याची विचारणा केली होती.. ज्या कोणाला या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना मदत करायची आहे त्यांचयासाठी खालील प़माणे बॅंक डिटेल देत आहोत .. पार्वतीबाई यांना आर्थिक आणि वैद्यकीय मदतीची गरज आहे..नाव :पार्वतीबाई शंकरराव मुळे रा. माजलगाव.बॅंकेचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा माजलगाव खाते क़मांक :52179662001IFSC coad:sbin0020035

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here