अजित  पवारांचे  चिरंजीव पार्थ यांनी तुळजापुरात आपल्या वडिलाच्या स्वभावाचा नवा पैलू पत्रकारांसमोर मांडला. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचाररॅलीत शुक्रवारी सहभागी झालेल्या पार्थ यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, नम्रपणे नकार देत पप्पा पत्रकारांना बोलू नको म्हणालेत, असे प्रांजळपणाने सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार आणि राणाजगजितसिंह यांचे चिरंजीव मल्हार पाटील ही काका-पुतण्याची मिनी जोडी या रॅलीचे सार्थ्य करीत होती. काकाचे वय २२ तर पुतण्याचे वय १७. तुळजापूरकरांना या युवा नेतृत्वाचे आकर्षण वाटल्याने रस्त्याच्या दुतर्फा लोक कौतुकाने पहायला थांबले होते. उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव रॅलीत आहेत म्हंटल्यावर पत्रकारांना त्यांना बोलण्याचा मोह अनावर झाला. चार-दोन पत्रकारांनी कॉर्नरच्या खिंडीत त्यांना गाठीत प्रश्नांचा भडीमार केला. परंतु पार्थ याने सार्‍या प्रश्नांवर मौन हेच उत्तर दिले. तुम्हा पत्रकारांना बोला अशी विनंती केल्यावर पप्पा पत्रकारांना बोलू नको म्हणालेत, असे प्रांजळ आणि दिलखुलासपणे त्यांनी सांगूनही टाकले. या पत्रकारांनाही हासू आवरता आले नाही. मल्हार मात्र गरजले
पार्थ यांचे मौन दिसत असले तरी रॅलीच्या सांगतेवेळी मल्हार मात्र गरजले. माझ्या एका शब्दाखातर माझे काका तुळजापूरात प्रचाराला आले. त्याबद्दल आभारी असल्याचे सांगत, भविष्यात आपली ‘काका-पुतण्याची जोडी’ धूमाकुळ घालेल, असे भाकीतही करुन टाकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here