पत्रकार हल्ला विरोधी दिन जगभर साजरा 

0
866

 “पत्रकार हल्ला विरोधी दिन”जगभर साजराआ ज आंतरराष्ट्रीय पत्रकार हल्ला  विरोधी दिवस आहे.तो भारत सोडून जगभर साजरा केला गेला.असा काही दिवस साजरा होतोय हेच भारतातील अनेकांना माहिती नव्हते किंवा नाही.हा दिवस साजरा का केला जातोय? याची पार्श्‍वभूमी समजून घेतली पाहिजे.जगभरात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यामुळे चिंतीत युनायटेड नेशनने 2013 मध्ये झालेल्या आपल्या 68 व्या आमसभेत एक ठराव संमत केला .त्यानुसार जगातील सर्व देशांनी “पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करून पत्रकारांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी” अशी सूचना केली आहे.तसेच 2 नोव्हेंबर 2013 मध्ये युध्दग्रस्त मालीमध्ये मारण्यात आलेल्या दोन पत्रकारांच्या स्मृतीप्रित्यर्थ जगभरात आंतरराष्ट्रीय पत्रकार हल्ला विरोधी दिवस साजरा कऱण्याचे आवाहन केले .त्यानुसार आज जगभरात हा दिवस साजरा होत असला तरी भारतात मात्र आनंदी आनंद आहे .युनायटेड नेशनने असा ठराव संमत करावा यासाठी देखील मोठा लढा द्यावा लागलेला आहे.

तेरा वर्षापूर्वी (2002)  वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्लचे पाकिस्तानमध्ये अपहरण झाले होते.नंतर त्यांची हत्त्या करण्यात आली.अफगाण आणि पाकमध्ये उच्छांद मांडलेल्या अल कायदाच्या विरोधात पर्ल यांनी मोहिमच उघडली होती त्याची शिक्षा त्यांना आपले प्राण गमावून मोजावी लागली.त्यांच्या हत्त्येनंतर पर्ल यांच्या पत्नी मरियाना पर्ल यांनी पत्रकारांचे अपहरण करून त्यांच्या हत्त्या करण्याच्या प्रकाराच्या विरोधात युएनने ठोस कारवाई करावी आणि पत्रकारांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने जगातील राष्ट्रांना काही सूचना कराव्यात अशी मागणी केली होती आणि त्याचा पाठपुरावाही केला होता.2013मध्ये मालीत दोन पत्रकारांची हत्त्या झाल्यानंतर युएनलाही या विषयाचे गांभीर्य लक्षात आले .त्यानंतर मरियाना यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.आणि युएनने एक ठराव संमत केरून पत्रकारांच्या वाढत्या हत्याबद्दल चिंता व्यक्त केली तसेच सर्वच राष्ट्रांनी पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी योग्य ती पाऊले उचलावीत अशीही सूचना केली होती.त्याचा एक भाग म्हणून पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याची सूचनाही युनायटेड नेशनने केलेली आहे.मात्र भारतासह अनेक देशांनी युएनच्या या ठरावाची फारशी दखल घेतलेली नाही.भारतातील महाराष्ट्र,उत्तरप्रदेश,बिहार आदि राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घठनात चिंताजनक वाढ झालेली आहे.एकट्या महाराष्ट्रात 1 नोव्हेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2015 या भाजप-सेनायुतीच्या सत्ताकाळात 89 पत्रकारांवर हल्ले झाले किंवा त्यांना धमक्या दिल्या गेलेल्या आहेत.महाराष्ट्रात गेल्या 30 वर्षात 19 पत्रकारांच्या हत्त्या झालेल्या आहेत.गेल्या दहा वर्षात 49 वृत्तपत्रे किंवा वाहिन्यांच्या कार्यालयावर हल्ले झालेले आहेत आणि गेल्या दहा वर्षात पत्रकारांवरील हल्ल्याच्या 800वर घटना घडलेल्या आहेत.प्रचलित कायद्यानुसार 95 प्रकराणातील आरोपीना काहीही शिक्षा झालेली नाही किंवा बहुतेक प्रकरणात त्यांच्यावर कारवाई ेदेखील झालेली नाही.त्यामुळे महाराष्ट्रात पत्रकारांच्या सोळा संघटनांनी एकत्र येत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातून पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी केली जात आहे.2005 पासून ही मागणी केली जात आहे.युनायटेड नेशनही संरक्षण कायदा करावेत असा ठराव संमत केल्यानंतर तरी महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडतील आणि कायदा लवकरात लवकर संमत केला जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.पत्रकार संरक्षण कायदा केवळ महाराष्ठ्रातच लागू झाला पाहिजे असे नाही तर तो देशभर लागू केला जावा अशी आपली मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here