मुबईत टाटामध्ये उपचार घेत असलेले प रभणी येथील पत्रकार शिवाजी क्षीरसागर यांना उपचारासाठी पंतप्रधान कार्यालया कडून तीन लाख रूपये मंजूर झाल्याचा निरोप प्राप्त झाला आहे.क्षीरसागर यांच्यावरील उपचारासाठी सहा लाख रूपये खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र सरकारने त्यांना 1 लाख 65 हजारांचा निधी दिला आहे.आता पंतप्रधानांकडून तीन लाख मिळणार असल्याने शिवाजीला मोठा दिलासा मिळाला आहे.शिवाजीचे परभणीचे मित्र धनंजय चव्हाण आणि अन्य काही मित्रांनी खासदार जाधव यांच्याकडे पाठपुरावा करून शिवाजीला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.
गरजू रूग्णांनी पंतप्रधानांच्या नावे अर्ज तयार करून त्यावर खासदाराची शिफारस घेऊन जर तो अर्ज पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला तर मदत लगेच मिळू शकते.शिवाजीला मदत मिळवून देण्यासाठी खा.जाधव यांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत.