तीन पत्रकार कृषीमित्र

0
783

पुणे ( टीम बातमीदार ) पुणे जिल्हयातील दोन पत्रकारांना राज्य सरकारचा कृषीमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे,इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील सकाळचे बातमीदार ज्ञाने्श्वर रायते आणि रोठरे बुद्रुक येथील बातमीदार अमोल जाधव हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.शेती विषयक लिखाण करून शेती उत्पादन वाढविण्यास हातभार लावणाऱ्या पत्रकारांना दरवषीर् या पुरस्काराने गौरविले जाते.राज्यपालांच्या हस्ते एका शानदार आणि अविस्मरणीय कायर्क्रमात हा पुरस्कार वितरण केले जाते.पुरस्काराची रक्कम २५ एवढी असते.कृषी मित्र,कृषी रत्न,कृषी भूषण या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना एस.टी.च्या एशियाडमधील प्रवास मोफत करावा अशी मागणी गेली अनेक वषेर् होत आहे मात्र त्याकडं लक्ष दिले जात नाही.दलित मित्र पुरस्कार ज्यांना मिळाले आहेत त्यांना ही सवलत दिली जाते.त्याच धतीर्वर कृषी मित्रांसाठीही ही सवलत दिली जावी.यंदाच्या कायर्क्रमात यासंबंधीची घोषणा व्हावी अशी अपेक्षा आहे.आता पयर्त हा पुरस्कार मिळविणारे एक हजार देखील शेतकरी नसतील.त्यांना ही सवलत देणे अवघड नाही.पुणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र कापसे आणि पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे यानी अभिनंदन केले आहे.सकाळचे चोपडा येथील बातमीदार ऍड.बालकृष्ण पाटील यांंंनाही कृषीमित्र पुरस्कार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here