राजन वेलकर.. एक एकांडा शिलेदार

1
1146

राजन वेलकर.अलिबागेतून प्रसिध्द होणाऱ्या रायगड टाइम्सचा तरूण संपादक.स्वभावानं शांत,अबोल असलेला राजन जेवढा जिद्दी तेवढा धडपडया आहे.वेगळं काही तरी करून दाखविण्यासाठी त्याची नेहमीच धडपड असते.कोणताही पाठिंबा नाही,कोणाचंही आर्थिक पाठबळ नाही,कोणीही गॉडफादर नाही.एकांडा शिलेदार असलेल्या राजनने चार वर्षांपूर्वी टॅबोलाईट आकारात अलिबागेतून रायगड टाइम्स सुरू केला. राजन टिकेल काय असा प्रश्न तेव्हा माझ्यासह अऩेकांना पडला होता.पण राजनने अंकाच्या गुणवत्तेच्या बळावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.अलिबागकरांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला.त्याचाही उत्साह वाढला.त्यानंतर आता पूर्ण आकारात फोर कलरमध्ये आठ पानी अंक तो प्रसिध्द करीत आहे.दैनिक काढणं आणि ते अखंडपणे चालवणं हे भल्या भल्यांना ज जमणारं काम राजननं केलंय.एक उत्कृष्ट,परिपूर्ण अंक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून राजनच्या रायगड टाइम्सकडं बघता येईल.जिल्हयातील प्रस्थापित आणि आर्थिकदृष्टया प्रबळ असलेल्या दैनिकांच्या थोबाडीत मारील असा राजनचा अंक असतो.प्रभावी आणि परिणामकारक शिर्षक,आकर्षक मांडणी आणि कोणाचीही भिडमुर्वत न ठेवणारी रोखठोक भूमिका हे रायगड टाइम्सचं बलस्थान आहे.लोकसभा निवडणुकीत स्पष्ट आणि निःपक्ष भूमिका घेतल्यानं त्याचा नक्कीच आर्थिक तोटा झाला मात्र त्यानं आपली लेखणी कोणाकडं गहान टाकली नाही.तटस्थ आणि निःपक्ष भूमिकेमुळे रायगड टाइम्स आज रायगडमधील एक वाचनीय दैनिक म्हणून लोकप्रिय झालं आहे.अलिबाग सारख्या छोट्या शहरातून एवढा चांगला अंक निघतो यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही हे नक्की.राजन वेलकरचा आज वाढदिवस आहे.त्याची धडपड,त्यानं एवढ्या कमी वयात जगाचा घेतलेला कटू अनुभव आणि त्याची जिद्द मला माहिती असल्यानं मला त्याचा नेहमीच अभिमान वाटतो.त्याला बातमीदार परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेछ्‌चा.राजनचा प्रवास वेगळ्या पण एका आश्वासक वाटेनं चालू असल्यानंच त्याची आम्हाला वेगळ्या वाटेनं जाताना या सदरात आवर्जुन दखल घ्यावी वाटली

1 COMMENT

  1. sir
    Khup chaan kautuk keley majhya mitrache!
    Rajan la ase olkhnare far kami aahet! pan je aahet te tyala sarvat javlche mantil asa rajan ahe! pratyekala aaplyashi jodnarya rajanla fakt manus jodne hech moth vyasan ahe! raigad times purvi tyane Alibag Times he dainik suru kele hote! 2007 madhe alibag madhe aalelya rajan la koni olkhathi navhte! pan tyachya likhanane to aaj anekanchya galyatle tait banla aahe!
    tyachya lekhnila jiddila majha Salam!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here