पत्रकार मारहाण,पोलिस निलंबित

0
902

मध्यप्रदेशमधील भोपाळमध्ये पत्रकार पिपल्स समाचारचे प्रतिनिधी अजय वर्मा यांना पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या एक पोलिस निरीक्षक सुरेश सिंह आणि गाौरेलाल नावाच्या पोलिस शिपायाला निलंबित कऱण्यात आलं असून ठाणा इन्चार्ज राजुकुमार सराफ यांच्यावरही आता कारवाई होण्याची शक्यता आहे.राज्याचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी पत्रकाराला झालेल्या मारहाणीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.मागच्या शुक्रवारी अजय वर्मा यांना ठाण्यात मारहाण करण्यात आली होती त्यात ते गंभीर जखमी झाले होते.टीटीनगर पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला होता.पोलिस स्टेशनसमोर आत्मदह करण्यास आलेल्या एका व्यकत्ीची पोलिस पिटाई करीत होते हे पाहून अजयने आपल्या फोटोग्राफरला बोलावण्यासाठी फोन केला हा प्रकार पोलसाच्या लक्षात येेताच त्यांनी अजयला ओढत ठाण्यात नेले तेथे त्याची जमकर पिटाई केली.या विरोधात भोपाळमधील पत्रकारानी निषेध केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here