पत्रकार प्रभाकर नूलकर यांचे निधन 

0
886

सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर नूलकर (वय 84) यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. श्री. नूलकर यांनी वयाच्या विसाव्या वर्षी पत्रकारीतेस सुरुवात केली. त्यांनी सोलापुरातील समाचार आणि विश्‍वसमाचार या दैनिकांत कार्यकारी संपादक म्हणून कार्य केले. दैनिक संचारमध्येही त्यांनी काही काळ संपादकीय विभागात काम केले. 53 वर्षे त्यांनी राजकीय, सामाजीक, साहित्य, चित्रपट, नाटक या विषयावर विविधांगी लेखन केले. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here