16 नोव्हेंबर 2017 च्या पत्रकार आंदोलनासंबंधी महत्वाच्या सूचना
16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन असतो..या दिनाच्या औचित्य साधून महाराष्ट्रातील पत्रकार पेन्शन,छोटया वृत्तपत्रांचे प्रश्‍न,मजिठियाची अंमलबजावणी आदि मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत.
1) राज्यातील प्रत्येक जिल्हयात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन होईल.
2) आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांना आपल्या मागण्यांचे निवदेन दिले जाईल.
3) जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणारे निवेदन सर्वत्र एक सारखे असावे यासाठी 14 तारखेला हे निवेदन प्रत्येक जिल्हयातील पदाधिकार्‍यांना पाठविण्यात येईल.
4) आंदोलन पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली होत असले तरी राज्यातील पत्रकारांच्या विविध संघटना या आंदोलनात सहभागी होत आहे.प्रत्येक जिल्हयात अन्य संघटनांना बरोबर घेऊन हे आंदोलन करावे
5) 16 तारखेला दरवर्षी माहिती आणि जनसंपर्क विभागातर्फे प्रत्येक जिल्हयात जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे उपचार पार पाडले जातात.यावर्षी आपला या कार्यक्रमावर बहिष्कार असेल.
6) 16 तारखेला राज्यातील पत्रकारांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री तसेच माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक श्री.ब्रिजेश सिंग यांना किमान 10,000 एसएमएस पाठविले जातील.त्याचा मजकुर आणि मोबाईल नंबर कळविले जातील.
7) आंदोलनात सहभागी होणार्‍या पत्रकारांनी हातावर काळी पट्टी बांधावी
8) प्रत्येक जिल्हयातील मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न जिल्हा पत्रकार संघांनी पुढाकार घेऊन आंदोलनाचे नियोजन करायचे आहे.
9) आंदोलन यशस्वी कऱण्यासाठी सर्वांचा सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे.
10) आंदोलना संबंधीच्या बातम्या तसेच आंदोलनानंतर या बातम्यांना आपल्या भागातील वृत्तपत्रांमधून,वाहिन्यावरू व्यापक प्रसिध्दी मिळेल यादृष्टीने प्रयत्न करावेत.
11)छोटया वृत्तपत्रांचे प्रश्‍न मांडणारा एस.एम.देशमुख यांचा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी तो आपल्या भागातील दैनिकात प्रसिद्ध होईल यासाठी प्रयत्ने करावे

12) 16 तारखेला व्हॉटसअ‍ॅपवरील आपला डीपी काळा ठेऊन पत्रकारांच्या प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधले जावे.

13) आंदोलनाच्या तयारीसाठी बैठक व्हावी तसेच त्यासाठी आपल्या जिल्हयातील विविध पत्रकार संघटनांना बरोबर घ्यावे.

विनित
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती                        मराठी पत्रकार परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here