सच कहू चे पत्रकार संदीप कुमार यांना 17 ऑगस्ट 2012 रोजी पोलिसांनी अत्यंत बेकायदेशीररित्या ताब्यात घेत त्यांना पोलिस कोठडीत डांबून त्यांना बेदम मारहाण केली होती.त्यांना दोषी ठरविण्यासाठी त्यांच्या हातात जबरदस्तीने तलवार देऊन त्याचे फोटो देखील काढले होते.या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला गेला आणि माध्यमकर्मींनी त्याविरोधात उग्र निदर्शनेही केली होती.या घटनेच्या विरोधात मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती.त्यानुसार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चौकशी अहवाल सादर कऱण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार अंबाला ग्रामीणचे नाजनीन भसिन यांनी अहवाल सादर केला होता पण त्याने आयोग समाधानी नव्हता.आयोगाच्या मते या चौकशी अहवालात पत्रकाराने दिलेल्या पुराव्याक डे दुर्लक्ष केलेले होते.त्यामुळे आता आय़ोगाने नव्याने पोलिस महासंचालक श्रीनिवास वशिष्ट यांना अहवाल सादर करायला सांगितले आहे.त्यासाठी सहा आठवड्याची मुदत दिली गेली आहे.या घटनेमुळे अंबाला आणि एकूणच हरियाणातील पत्रकार आनंदीत आहेत.

आपल्याकडेही पोलिस मनमानी पध्दतीने पत्रकारांना त्रास देत असतात.अशा पोलिसांच्या विरोधात मानवी हक्का अयोगाकडे तक्रार करता येते.या आयोगाचे मुंबईतील कार्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ आणि मराठी पत्रकार परिषदेचे कार्यालय ज्या परिसरात आहे तेथेच आहे.

LEAVE A REPLY