माथेरान ः प्रतिनिधी
माथेरान येथील पत्रकार संजय भोसले याच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांना मारहाण करणार्या बंटी धावरे याला आज सायंकाळी माथेरान पोलिसानी दरीत उतरून बाहेर काढले आणि पकडले.काल रात्री या बंटी धावरेनं संजय भोसले याचंया घरी जाऊन धुडगूस घातला होता.दिव्यांग बहिणीला शिविगाळ केली तर 82 वर्षांच्या वडिलांना मारहाण केली.या घटनेची संपत्प प्रतिक्रिया राडगडमधील पत्रकारांमध्ये उमटली.मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव संतोष पेरणे यांनी आज माथेरानला जाऊन स्थानिक पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन बंटी धावरेला तातडीने अटक केली नाही तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल असा इशारा दिल्यानंतर पोलीस कामाला लागले आणि उशिरा बंटी घावरेला पोलिसांनी पकडले.
रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय मोकल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.विजय मोकल आणि त्यांचे सहकारी उद्या माथेरानला जाऊन संजय भोसले यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देतील.
पत्रकाराच्या वडिलांना मारहाण करणारा बंटी धावरेला पकडले