Monday, May 17, 2021

पत्रकाराच्या आईची आणि मुलीची हत्त्या

त्रकाराच्या आईचे आणि मुलीचे अपहरण करून त्यांची हत्त्या

करणारया आरोपीचा शोध घेऊन कडक कारवाई करा :एस. एम देशमुख 
नागपूर :

नागपूर शहरातील ‘नागपूर टुडे’ या संकेतस्थळाचे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई आणि चिमुकल्या मुलीचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या दोघीही शनिवार सायंकाळपासून बेपत्ता होत्या. ही घटना धक्कादायक आणि निषेधार्ह असून यातील आरोपींचा शोध घेउन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

उषा सेवकदास कांबळे (५४) आणि राशी रविकांत कांबळे (१८ महिने) अशी या दोघींची नावे आहेत. दिघोरीतीली पवनपुत्रनगर येथे हे कुटुंब राहते. या दोघीही शनिवारी संध्याकाळी ५.३० पासून बेपत्ता होत्या. उषा या नातीला घेऊन काही खरेदी करण्याकरिता किराणा दुकानात गेल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत. रात्री उशीरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोघींचा कसून शोध घेणे सुरु केले.

गृहमंत्र्यांच्या शहरातील ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बहादुरा नाला परिसरात रविवारी उघडकीस आली. सकाळी १०.३० च्या सुमारास विरगाव परिसरातील बहादुरा नाल्यात फेकण्यात आलेल्या पोत्यात या दोघींचे मृतदेह आढळून आले. या दोघींची गळा आवळून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर दोघींचे मृतदेह पोत्यात भरून नाल्यात फेकण्यात आले. या घटनेने उपराजधानीत एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

शाब्बास विजय गराडे

शाब्बास विजय गराडेआम्हास आपला अभिनान आहे.. मुंबई : पत्रकार फक्त स्वतःसाठीच ऑक्सीजन किवा अन्य आरोग्य सुविधा मागतात असं नाही गरजेनुसार ते सामांन्य रूग्णांना देखील ऑक्सीजन...

मंत्र्यांच्या पत्रांना ही “केराची टोपली”

*डझनभर कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्रांनामुख्यमंत्र्यांकडून केराची टोपलीमंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर मुंबई : "राज्यातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून मान्यता द्यावी" अशी मागणी करीत राज्यातील बारा प्रमुख मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना...

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,960FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

शाब्बास विजय गराडे

शाब्बास विजय गराडेआम्हास आपला अभिनान आहे.. मुंबई : पत्रकार फक्त स्वतःसाठीच ऑक्सीजन किवा अन्य आरोग्य सुविधा मागतात असं नाही गरजेनुसार ते सामांन्य रूग्णांना देखील ऑक्सीजन...

मंत्र्यांच्या पत्रांना ही “केराची टोपली”

*डझनभर कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्रांनामुख्यमंत्र्यांकडून केराची टोपलीमंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर मुंबई : "राज्यातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून मान्यता द्यावी" अशी मागणी करीत राज्यातील बारा प्रमुख मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना...

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...
error: Content is protected !!