पत्रकाराचे अपहरण

0
724

मुंबई( प्रतिनिधी ) चार दिवसांपूर्वी मुंबईतील पत्रकार अनिल जोशी यांचे अपहरण करून त्यांच्याकडील 49 हजार रूपये लुबाडून पळ काढणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांन काल अटक केली आहे.
काही दिवसांपुर्वी एका इसमाला जोशींचा धक्का लागला होता.त्यावरून दोघात बाचाबाचीही झाली होती.तो राग मनात धरून जोशी दादर स्थानकाजवळील बाबुभाई भवानजी शोरूममध्ये न्याहारीसाठी गेले असता त्यांना मारहाण करीत दोघांनी त्यांना टॅक्शीत कोंबले.आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या जवळील 49 हजार रूपये लुटले.नंतर त्याना मारहाण करून चेंबुर येथील निर्जनस्थळी सोडण्यात आले.त्यानंतर जोशी यांनी माटुंगा पोलिसात तक्रार नोंदविली होती.त्यानुसार दोघांना पकडण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here