पत्रकारांसाठी भारत धोकादायक

0
766

गेल्या 25 वर्षांत पत्रकारांसह माध्यम क्षेत्रात काम करणार्‍या 2 हजार 297 व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. मागील वर्षभरात 112 माध्यम क्षेत्रांतील व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. तर 2006 या एकाच वर्षात सर्वाधिक 155 जणांची हत्या करण्यात आली आहे. पत्रकारांना सर्वाधिक धोकादायक असलेल्या देशांची यादीही आयएफजेने प्रसिद्ध केली आहे. पत्रकारांसाठी धोकादायक असलेले टॉप 10′ देश इराक (309), फिलिपाईन्स (146), मेक्सिको (120) , पाकिस्तान (115), रशिया (109), अल्जेरिया (106), भारत (95), सोमालिया, (75), सिरीया (67), ब्राझील (62). संघटित गुन्हेगार आणि भ्रष्ट अधिकार्‍यांनीच आतापर्यंत बहुतेक पत्रकारांची हत्या केली आहे’, अशी माहिती आयएफजेचे सचिव ऍन्थोनी बेलांगर यांनी म्हटले आहे.

अपहरण, स्फोट, गोळीबार आदीप्रकारे या पत्रकारांची हत्या करण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here