गंगाखेडः पत्रकारांनी ठरविलं तर ते काय करू शकतात हे गंगाखेडच्या पत्रकारांनी दाखवून दिलंय..नांदेड पनवेल ही सुपरफास्ट रेल्वे गाडी गंगाखेडवरून जाते.गंगाखेड हे तालुक्याचं ठिकाण असूनही या गाडीला गंगाखेड स्थानकात थांबा नव्हता.त्यामुळं पुणे आणि मुंबईला जाणार्‍यांना परळीला जावं लागायचं.लोकांची गैरसोय व्हायची.हा विषय गंगाखेड तालुका पत्रकार संघानं हाती घेतला..रेल्वे मंत्रालय,लोकप्रतिनिधी यांच्याकडं पाठपुरावा केला.त्याला अखेर यश आलंय.आता 1 ऑक्टोबर पासून नांदेड-पनवेल ही गाडी गंगाखेडला थांबणार आहे.या गाडीचं स्वागत कऱण्याचा एक कार्यक्रम पत्रकार संघानं रेल्वे स्थानकात ठेवला आहे.यावेळी जनतेनं उपस्थित राहावं असं आवाहन अजित गणाचार्य,पिराजी कांबळे आणि अंकुश वाधमारे या पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी केलं आहे.केवळ बातमी देणं एवढंच आमचं काम नाही तर आम्ही लोकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करणं त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणं हे देखील आमचं काम असल्याचं गंगाखेडच्या टीमनं दाखवून दिलं आहे.गंगाखेडच्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन.

LEAVE A REPLY