पत्रकारांच्या आंदोलनास यश

0
857

मुंबई-गोवा महामागर्च्या चौपदरीकरणास
केंद्र सरकारचा हिरवा कंदिल

मुंबई-गोवा महामागार्चे उवर्रित टप्पे तसेच वडखळ – अलिबाग या रस्त्याच्या चौपदरीकरणास केंद्र सरकारने मान्यता दिल्याने रायगडमधील पत्रकारांनी आनंद व्यक्त करून केंद्रीय महामागर् आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धन्यवाद दिले आहेत.मुंबई-गोवा महामागार्च्या इंदापूर ते पळस्पे या ८४ किलो मीटरच्या पहिल्या टप्पयाचे काम सुरू असले तरी इंदापूरच्या पुढील टप्प्याचे काम अजून सुरू झालेले नाही.ते तात्काळ सुरू करावे यामागणीसाठी कोकणातील पत्रकारांनी २५ जून रोजी कशेडी घाट रोको आंदोलन केले होते. या आंदोलनात ४० पत्रकारांना अटकही झाली होती.नितीन गडकरी यांच्याकडेही याबाबतचा पाठपुरावा केला गेला होता.त्याची दखल घेत नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामागार्चे चौपदरीकरण करण्यास मान्यता दिली आहे.केंद्र सरकारने काल महाराष्ट्रातील २३१२ कोटी रूपायांच्या तब्बल ४० प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.त्यात मुंबई-गोवा आणि वडखळ अलिबाग या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचा समावेश आहे.
रायगड प्रेस क्लबने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पत्रकारांच्या आंदोलनाची दखल घेत तातडीने मुंबई-गोवा महामागाचा रखडलेला प्रकल्प पूणर् करण्यास प्राधान्य दिल्याबद्दल नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.या पत्रकावर ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख तसचे प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार ,मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार,विभागीय चिटणीस मिलिंद अष्टीवकर माजी अध्यक्ष अभय आपटे आदिंच्या स्वाक्षऱ्या आङेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here