आमचे मित्र चंदन पवार यांनी नाशिक येथे नव्यानेच सुरू केलेल्या न्यूजवर्ल्ड या वाहिनीच्या कार्यालयास भेट देण्याचा योग काल आला.सुसज्ज इमारत,अत्याधुनिक यंत्रणा,प्रशिक्षित कर्मचारी आणि रिपोर्टर्सची चांगली टीम आणि मुळातच पत्रकारितेवरील निष्ठेच्या बळावर पवार यांनी सुरू केलेले न्यूजवर्ल्ड नाशिकमध्ये नक्कीच यशस्वी होईल यात शंका नाही.नाशिकमध्ये याअगोदरही काही स्थानिक वाहिन्या कार्यरत आहेत.तरीही पवार यांनी जे धाडस केले आहे ते कौतुकास्पद आहे..चंदन पवार यांच्या उपक्रमास शुभेच्छा.
काल नाशिक येथे मी आणि नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत पवार यांनी न्यूजवर्ल्डच्या कार्यालयास भेट दिली तेव्हा आमचे चंदन पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपलेपणाने स्वागत केले.त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.