न्याय मिळेल?

0
720

महिला दिनाच्या मुहूर्तावर तरी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील दोन अभागी महिलांना न्याय मिळेल?

पार्वतीबाई मुळे यांचा न्यायासाठी तब्बल 25 वर्षे संघर्षमाजलगाव :”स्वातंत्र्य सैनिकांच्या वयोवृद्ध विधवेची परवड” या मथळ्याखाली काल स्टोरी प़सिध्द झाल्यानंतर राज्यभर हळहळ आणि व्यवस्थेबद्दल संताप व्यक्त होत आहे.. शिवसेना नेत्या निलमताई गोरे यांनी देखील स्टोरीची दखल घेऊन विचारपूस केली, मदतीची तयारी दर्शविली आहे..परंतू विषय इथंच संपत नाही.. पार्वतीबाई मुळे यांची दोन्ही मुले हयात असल्यापासून मुळे कुटुंबिय न्यायासाठी झगडत आहे.. सरकारने त्यांना राहण्यासाठी घर द्यावे अशी मागणी स्वातंत्र्य सैनिकांचे हे कुटुंब 1997 पासून करीत आहे.. त्यावेळेस देखील पार्वतीबाई मुळे यांच्या मुलांनी सातत्यानं जिल्हाधिकारी तसेच तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.. पण त्यांची कोणी दखल घेतली नाही.. आज त्यांची दोन्ही मुलं मृत्युमुखी पडली आहेत.. 90 वर्षांच्या आजी आणी 60 वर्षांची मित्रवृंदा ही मुलगी अशा दोघीच आहेत.. दुख व्यक्त कोणाजवळ करावे आणि कोण न्याय मिळवून देईल असा प्ंशन त्यांना पडलेला आहे..कोणी तरी देवदुत येईल आणि आपलं दु:ख हलकं करील ही उम्मीद ही या मायलेकींनी आता सोडली आहे.. गेली पंचवीस वर्षे सातत्यानं न्यायासाठी टाहो फोडणारया मुळे कुटुंबियांची दखल घेत 3 फेब्रुवारी 1997 रोजी सामना दैनिकाने बातमी झापली होती.. ती एका पत्रकार मित्रानं उपलब्ध करून दिली आहे.. ती सोबत जोडली आहे.. ज्यांना कोणी नाही त्यांची व्यवस्थाही दखल घेत नाही हेच या बातमीवरून दिसते.. झोपलेली व्यवस्था पंचवीस वर्षानंतर तरी जागी होईल आणि ऊद्या च्या महिला दिनाच्या मुहूर्तावर तरी दोन अभागी महिलांचे अखंड वाहणारे अश्रू पुसले जातील अशी अपेक्षा करता येईल का?

15Sunil Walunj, Datta Ambekar and 13 others1 Comment12 SharesLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here