‘नॅशनल हेरल्ड’ पुन्हा सुरू होणार

0
767

,कॉग्रेस लागले निवडणूक तयारीला

नवी दिल्ली -ऑर्गनाइझर ,तरूण भारत ही परिवाराची मुखपत्रे आहेत तर सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे.या मुखपत्रांचा त्या त्या पक्षाला नक्कीच फायदा होतो.तोच अनुभव डोळ्यासमोऱ ठेवत कॉग्रेसनंही आपली बंद पडलेली नॅशनल हेरल्ड आणि नवजीवन ही मुखपत्रे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.2019 डोळ्यासमोर ठेऊन कॉग्रेसने तयारी सुरू केली आहे असं समजलं जात आहे.–

कॉंग्रेस पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे इंग्रजीतील “नॅशनल हेरल्ड‘ आणि हिंदीतील “नवजीवन‘ ही दैनिके पुन्हा एकदा वाचकांच्या भेटीस येणार असल्याची घोषणा “असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड‘ (एजेएल) च्या वतीने आज करण्यात आली. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1937 मध्ये “एजेएल‘ या कंपनीची स्थापना केली होती. या दोन्ही वर्तमानपत्रांच्या मुख्य संपादकपदी ज्येष्ठ पत्रकार नीलभ मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. मिश्रा यांच्याकडे वर्तमानपत्राच्या संपादकपदाबरोबरच डिजिटल माध्यमाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मिश्रा यांनी यापूर्वी “आउटलूक‘ या नियतकालिकाचे संपादकपद भूषविले असून “नॅशनल हेरल्ड‘ आणि “नवजीवन‘साठी संपादकीय टीम उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ही दैनिके पंडित नेहरूंच्या उदारमतवादी विचारधारेचा पुरस्कार करण्याबरोबरच पुरोगामी, प्रगतशील विचारांचा वसा जपण्याचे काम करतील, असे “एजेएल‘ने म्हटले आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे खजिनदार मोतीलाल व्होरा हे “असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड‘चे अध्यक्ष आहेत. उर्दूमधून “कौमी आझाद‘ हे वर्तमानपत्रदेखील सुरू होणार आहे. यासाठी आधी डिजिटल, नंतर मुद्रित असा क्रम ठरविण्यात आल्याची माहिती कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिली.

निवडणुकीवर लक्ष
पुढील वर्षीच्या अनेक राज्यांमधील निवडणुका लक्षात घेऊन कॉंग्रेसने आपली मुखपत्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्याने 2008 मध्ये ती बंद करण्यात आली होती. कॉंग्रेसच्या मुखपत्रांची मालकी असणाऱ्या “एजेएल‘ कंपनीच्या देशात अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत. दिल्लीमधील “हेरल्ड हाउस‘ प्राइम लोकेशन म्हणून ओळखले जाते. अन्य इमारती आणि कार्यालये सध्या इतर उद्योगांसाठी भाडेतत्त्वावर वापरासाठी देण्यात आली आहेत

सकाळच्या आधारे साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here