महाराष्ट्रात आज दोन पत्रकारांवर हल्ले झाले.पहिली घटना नाशिकमध्ये घडली.नाशिक येथील दीव्य मराठीचे पत्रकार संदीप जाधव यांनी अवैदय धंद्याच्या विरोधात बातम्या दिल्यामुळे दीव्य मराठीच्या कायार्लयावर हल्ला करून संदीप जाधव यांना बेदम मारहाण केली गेली.त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आङे.पोलिस हवालदाराने अवैदय धंद्यावाल्यांना संदीपची माहिती दिली अशी माहिती मिळाली आहे.या घटनेची सरकारनं गंभीर दखल घेतल्याचे गृहराज्या मंत्री यांनी जाहिर केले आहे.
दुसरी घटना जळगावची.साप्ताहिक पोलीस व्हिजनचे पत्रकार गोपाल मांद्रे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.त्यात मांद्रे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांनाही रूग्णालायत दाखल केले गेले आहे.या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यात आली आहे.या दोन्ही हल्ल्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत असून सरकारनं पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी करीत आहे.महाराष्ट्रात पत्रकारांवर सातत्यानं हल्ले वाढले असून गेल्या सहा महिन्यातील वरच्या दोन घटना धरून ४१ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.