Tuesday, April 20, 2021

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणूकीत दिसले एकजुटीचे दर्शन !!!!

 पत्रकारांची मात्रॄ संस्था असणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची व्दैवार्षिक निवडणूक 3 ते 16 फेब्रुवारी 2014 या दरम्यान  पार पडली.महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांचे आकर्षण ठरलेली व सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या या निवडणुकीच्या निकालाने शेवट पर्यंत उत्कंठा तानून धरली.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक व पत्रकार हल्ला विरोधी कृति समितीचे निमंत्रक एस एम देशमुख यांच्या आदेशावरुन या निवडणुकीसाठी निरक्षक म्हणून माझी निवड झाल्याने ही निवडणुक प्रक्रिया मला जवळुन पाहता आली.निवडणुक जाहिर होताच संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी निवडणुक कार्यालयात मतदार यादी पाहण्यास गर्दी केली.गर्दी पाहूनच निवडणुक खुप अटी-तटीची होणार असा अंदाज आला.अध्यक्ष पदासह फक्त17जागेसाठी तब्बल 100 फॉर्म विक्री होऊन पत्रकारानांच्या निवडणुकीतला महाराष्ट्रात एक इतिहास घडला.त्यानंतर त्याच पटीत फॉर्मही जमा झाले.अर्ज छाननी,फॉर्म माघार प्रक्रियेनंतर निवडणुक अटळ आहे असे दिसत होते मात्र नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व पत्रकार केवळ पत्रकारांच्या एकजुटीसाठी एकत्र आले आणि ही अवघड वाटणारी निवडणुक बिनविरोध झाली.याकामी परिषदेचे किरण नाईक,एस एम देशमुख यांचे मार्गदर्शन व नांदेड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष केशव घोंणसे पाटील व मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी यांचे प्रयत्न कामी आले.या निवडणुकीच्या निमित्ताने पत्रकार एकीची बातमी क्षणात हिंगोली,परभणी, लातूर,बीड इत्यादी जिल्ह्यात पसरली व आपल्या जिल्ह्यातील निवडणुकाही नांदेड जिल्ह्याच्या निवडणुकीप्रमानेच करू या असा निर्धार पत्रकार मंडळीनी केला असल्याची चर्चा आहे. मराठी पत्रकार परिषद मुंबई यांनी माझ्यावर सोपलेली जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडू शकलो याचा मला आंनद मात्र वेगळाच आहे.
बापूसाहेब गोरे(कार्याध्यक्ष- पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ तथा निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड जिल्हा म.पत्रकार संघ 2014)

Related Articles

100 पत्रकारांचे बळी

महाराष्ट्रात दर दिवसाला दीड पत्रकाराचा मृत्यू सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले मुंबई बई दि. 18: महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात...

परभणीत पत्रकाराची आत्महत्या

चिंता वाढविणारी बातमीपरभणीत पत्रकाराची आत्महत्या परभणीकोरोनाचं संकट किती व्यापक आणि गहिरं होत चाललं आहे यावर प्रकाश टाकणारी आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारी बातमी परभणीहून आली...

भय इथलं संपत नाही…

भयइथलंसंपत_नाही….कोविद-19 च्या संसर्गाने सबंध भारतात अक्षरशः मृत्यूचे तांडव मांडले आहे. गेल्या महिन्यात फक्त महाराष्ट्रात थैमान घालताना दिसणारा कोरोनाचा महाजंतू आता सबंध देशावर नैराश्य, भीती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,832FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

100 पत्रकारांचे बळी

महाराष्ट्रात दर दिवसाला दीड पत्रकाराचा मृत्यू सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले मुंबई बई दि. 18: महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात...

परभणीत पत्रकाराची आत्महत्या

चिंता वाढविणारी बातमीपरभणीत पत्रकाराची आत्महत्या परभणीकोरोनाचं संकट किती व्यापक आणि गहिरं होत चाललं आहे यावर प्रकाश टाकणारी आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारी बातमी परभणीहून आली...

भय इथलं संपत नाही…

भयइथलंसंपत_नाही….कोविद-19 च्या संसर्गाने सबंध भारतात अक्षरशः मृत्यूचे तांडव मांडले आहे. गेल्या महिन्यात फक्त महाराष्ट्रात थैमान घालताना दिसणारा कोरोनाचा महाजंतू आता सबंध देशावर नैराश्य, भीती...

1036 पत्रकार कोरोनाचे बळी

जगभरात 1036 पत्रकार कोरोनाचे शिकार जगभरातील पत्रकारांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.. जगातील 73 देशात कोरोनानं तब्बल 1036 पत्रकारांचे बळी घेतल्याचा दावा स्वीत्झर्लन्डची माध्यम क्षेत्रात काम...

पत्रकारितेचा पासपोर्ट नव्हे…

अधिस्वीकृती म्हणजे पत्रकारितेचा पासपोर्ट नव्हेओळखपञ पाहून पञकाराना संचारबंदीतून सवलत द्या - मराठी पञकार परीषदेची मागणी मुंबई (प्रतानीधी) अधिस्वीकृती म्हणजे पञकारीतेचापासपोर्ट नाही राज्यात फक्त 8टक्के पञकारांकडेच...
error: Content is protected !!