नांदेड अधिवेशनाची जय्यत तयारी

नांदेड : नांदेड येथे 17 आणि 18 ऑगसट रोजी होणारया मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या राष्ट्रीय अधिवेशनाची जोरदार तयारी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने सुरू आहे.. नांदेड जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांचा सक़ीय सहभाग या अधिवेशनात असावा या उद्देशाने जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी तालुकावार बैठका घेऊन तालुका पत्रकार संघाच्या सूचना, मतं जाणून घेत आहेत.. अधिवेशनास देशभरातून 2500 पत्रकार प़तिनिधी येणार असल्याने सवाॅंची व्यवस्था व्हावी यादृष्टीने प्रत्येक तालुका संघांना विश्वासात घेउन नियोजन करण्यात येत आहे.. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर, परिषद कार्यकारिणी सदस्य प़काश कांबळे, जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे यांनी कंधार, लोहा, मुखेड आदि तालुक्यांना भेटी देऊन तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधला.. उवॅरित तालुक्यांना भेटी देण्याचे पदाधिकारयांचे नियोजन आहे.. नांदेड नगरीत होत असलेले हे ऐतिहासिक अधिवेशन नांदेडच्या प़तिषटेला साजेसे व्हावे यादृष्टीने नांदेडकर पत्रकार प्रयत्न करीत आहेत..

LEAVE A REPLY