बातमीदार नॉन स्टोॅप 30,000

0
822

माध्यमांवर होणारे हल्ले,त्यांचे प्रश्न,त्यांच्यावर विविध घटकांकडून होणारे अन्याय याच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही एक वर्षांपूर्वी उद्याचा बातमीदार ही बेवसाईट सुरू केली.वेबसाईटच्या अगोदरच्या रचनेतील मर्यादा लक्षात घेऊन अडिच महिन्यांपूर्वी आम्ही वेबसाईटच्या स्वरूपात अमूलाग्र बदल केले आणि ती 7 फेब्रुवारीला नव्यानं लॉंच केली.या घटनेला अजून तीन महिने देखील झालेले नाहीत.या काळात 30 हजार वाचकांनी बातमीदारला िव्हिजीट केली आहे. याचा अर्थ दर महा दहा ते अकरा हजार वाचक बातमीदारला भेट देतात.अनेकांनी इमेलव्दारे किंवा फोनवरून बातमीदार उत्त्तम काम करीत असल्याचंही सांगितलं.त्यामुळं आम्हाला नक्कीच बळ आलंय.एका विशिष्ट विषयाला वाहिलेली वेबसाईट चालवणं आणि वाचकांनाही ती आवडणं हा दुर्मिळ योग बातमीदारच्या बाबतीत घडलेला आहे.आम्ही महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचे आभारी आहोत.बातमीदार यापुढंही पत्रकारांची समाजात घसरत चाललेली प्रतिमा उंचावण्यासाठी आणि पत्रकारांच्या हक्काच्या प्रत्येक लढ्यात बिनीचा शिलेदार म्हणून काम करीत राहणार आहे.
राज्यातील पत्रकारांना विनंती आहे की,आपली कोणतीही अडचण,समस्या असेल किंवा आपणास कुणाकडून त्रास होत असेल किंवा हल्ला झालेला असेल तर आम्हाला udyachabatmidar@gmail.com या मेलवर त्याची माहिती कळवावी.त्याचा फॉलोअप आम्ही घेऊ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here