धनंजय मुंडे,निलमताईं,दीपिका चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार

0
1181

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धऩंजय मुंडे यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून पत्रकारावरील हल्ल्याचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करून राज्यात पत्रकार संरक्षण कायदा क रण्याची जोरदार मागणी केली. शिवसेनेच्या आमदार डॉ.निलमताई गोर्‍हे,कॉग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनीही या मुद्दयावर कायदा करण्याचा आग्रह सरकारकडे धरला.त्यावर गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी एक महिन्यात पत्रकार संरक्षण कायद्याचे प्रारूप तयार करण्यात येईल असे आश्‍वासन दिले.पत्रकार संरक्षण कायद्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून पत्रकारांच्या हल्लयाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माणिकराव ठाकरे आणि,निलमताई  अन्य सदस्यांचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती मनापासून आभारी आहे.धनंजय मुंडे यांनी यापुर्वी देखील पत्रकारांवरील हल्ल्याचा विषय सभागृहात उपस्थित केला होता.

धनंजय मुंडे यांनी आपला मुद्दा मांडताना सांगितले की,राज्यात गेल्या तीन वर्षात 265 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत,त्यात काही पत्रकारांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.मीरा रोड परिसरात राघवेंद्र दुबे या पत्रकाराची झालेली हत्त्या तसेच वार्तांकन करिती असताना महिला पत्रकाराचा झालेला विनयभंग या घटनामुळे पत्रकारांमध्ये असुरक्षिततेचे आणि भितीचे वातावरण असून पत्रकारांच्या सर्व संघटना कायद्याची मागणी करीत रस्त्यावर र्उींरल्या आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने नुकत्याच केलेल्या एसएमएस आंदोलनाचाही त्यानी उल्लेख केला.पत्रकारांची मागणी आणि वास्तव लक्षात घेऊन सरकारनं तातडीनं राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी त्यांनी केली.सरकार कायदा करणार की,संरक्षण परिषद स्थापन करणार याचा सरकारने खुलासा करावा अशी मागणीही त्यानी केली.त्याच बरोबर मुंडे यांनी प्रारूप तयार झाल्यावर सरकारने कायद्याचा अद्यादेश जारी करावा आणि हिवाळी अधिवेशनात अद्योदेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशीही मागणी केली.या चर्चेत माणिकराव ठाकरे ,नीलमताई गोर्‍हे,किरण पावसकर,हेमेंत टकले,संजय दत्त आदि सदस्यांनी भाग घेतला.
चर्चेत बोलताना निलमताई गोर्‍हे यांनी राघवेंद्र दुबे यांच्या हत्त्येचा खटला द्रुतगती न्यायालामार्फत चालविण्याची मागणी केली तसेच र्इींर पत्रकारावर जे हल्ले झालेत त्यांना वैद्यकीय मदतीसाठी सहाय्य करावे अशी मागणी केली.यावर सरकारने द्रुतगती न्यायालयाची मागणी केली.
पत्रकाराच्या प्रश्‍नांसंदर्भात सविस्तर अशी चर्चा प्रथमच सभागृहात घडवून आणल्याबद्दल धनंजय मुंडे,निलमताई यांच्यासह सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांचे आम्ही आभारी आहोत.या संबंधिचे बिल जेव्हा सभागृहात येईल तेव्हा सर्वांची आजच्यासारखीच सकारात्मक भूमिका असेल अशी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची अपेक्षा आहे.सरकार कायद्याबाबत सकारात्मक आहे आणि विरोधी पक्षांची भूमिकाही कायदा झालीच पाहिजे अशी असल्याने आता कायद्याला विलंब होता कामा नये असे राज्यातील तमाम पत्रकारांची इच्छा आहे
नाशिक जिल्हयातील बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी देखील विधानसभेत गुरूवारी पत्रकारांवरील हल्ल्याचा विषय औचित्याच्या मुद्याव्दारे उपस्थित करून पत्रकारांच्या न्याय मागणीबाबतचा आवाज उठविला त्याबद्दल दीपिका चव्हाण यांचेही मनापासून आभार .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here