दीपक चौरसियांनी देखील बॅगा भरल्या

0
988

अर्णब गोस्वामी पाठोपाठ आणखी एका नॅशनल टेलिव्हिजनच्या संपादकानं आपल्या बॅगा भरल्या आहेत.दीपक चौरसिया इंडिया न्यूज सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरूय.व्यवस्थापनाबरोबरच्या कडाक्याच्या मतभेदामुळे चौरसिया यांनी ऑफिसमध्ये जाणे बंद केलंय.चर्चा अशी देखील आहे की,दीपक लाइव्ह इंडिया टेकओव्हर करण्याच्या नादात आहेत.दीपकच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार दीपक आजारी आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने ते ऑफिसला जात नाही इंडिया न्यूज सोडण्याच्या अफवांचे त्यांनी खंडण केले आहे.दीपकने इंडिया न्यूजला नंबर दोनवर आणल्यानंतर मालक कार्तिक शर्मा यांनी दीपकवर अंकुश आणणे सुरू केले.याचा एक भाग म्हणून दीपकच्या अनेक जवळच्या सहकार्‍यांना घरचा रस्ता दाखविला गेला.त्यामुलं घुश्यात असलेल्या दीपकने इंडिया न्यूजला रामराम ठोकण्याची तयारी चालविली असल्याची चर्चा आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here