दिल्लीत 3 पत्रकारांवर हल्ले

नवी दिल्लीःदिल्ली अशांत आहे.जाळपोल,दगडफेक सुरू आहे.तेरा जण ठार झालेत.अनेक जखमी झाले आहेत. दंगलीचं कव्हरेज जगाला दाखविणारे रिपोर्टर्स देखील यातून सुटलेले नाहीत.दिल्लीत तीन पत्रकार जखमी झाले आहेत.जेके 24 X 7 च्या वार्ताहरावर जीवघेणा हल्ला केला गेला..एनडीटीव्हीच्या दोन पत्रकारावर देखील ते एका घटनेचं वार्तांकन करीत असताना त्यांच्यावर हल्ला केला गेला.तर एका महिला पत्रकाराला तिचे काम थांबवून तिला परत जाण्यात भाग पाडले गेले.या घटनेचा मराठी पत्रकार परिषद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत आहे.
पत्रकारिता करताना पत्रकार कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा नसतो.पत्रकारिता हाच त्याचा धर्म आणि जात असते,असं असतानाही पत्रकारांना त्याचा धर्म विचारून त्यांच्यावर हल्ले केले गेले हे समाजकंटकांच्या संकुचित मानसिकतेचं लक्षण आहे.माघ्यमांवर हल्ले करून किंवा त्यांना त्यांच्या कामापासून रोखणे म्हणजे माध्यमांच्या अधिकाराची पायमल्ली करणे होय..यातील दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई कऱण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद करीत आहे..तसेच रिपोर्टिंग करताना पोलिसांनी पत्रकारांना संरक्षण दिले पाहिजे अशी मागणीही परिषद करीत आहे.

LEAVE A REPLY