वृध्द महिला पत्रकाराची हत्त्या

0
842

राजधानी दिल्लीतीन अनक इंग्रजी दैनिकामधून काम केलेल्या 80 वर्षीय महिला पत्रकार रेखा दुग्गल यांची अत्यंत निर्दयपणे हत्त्या केल्याचे समोर आले आहे.दिल्लीच्या ग्रेटर कैलास पार्ट-2 भागात काल रात्री हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.रेखा दुग्गल आपला नोकर निरज यांच्याबरोबर एकट्याच राहात होत्या.त्यानेच दुग्गल यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
निरज ने काल रात्री 9.45 वाजता पोलिसांना फोन करून रेखा दुग्गल फिरायला गेल्या त्या अजून परत आल्या नसल्याचे सांगितले.पोलिसांनी त्यांची चाौकशी सुरू केली असतानाच दुग्गल ज्या ठिकाणी राहतात त्या बिल्डिगच्या तिसऱ्या मजल्यास आग लागली.नंतर फायर ब्रिगडला पाचारण करण्यात आले.तेव्हा बेडरूममध्ये रेखा दुग्गल यांचा मृतदेह मिळाला.पोलिसांना गुमराह करून दुग्गल यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निरजचा प्रयत्न होता असं पोलिसांनी सांगितलं.
निरजने अगोदर गळा दाबून त्यांची हत्तया केली.नंतर त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला.हत्येपुर्वी आरोपीने दुग्गल यांच्यावर बलात्कारही करण्याचा प्रयत्न केला होता असे समोर आले आहे.मात्र पोस्टमार्टेम नंतरच बलात्कार झाला की नाही ते स्पष्ट होईल असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.आरोपीला पोलिसांनी अटक केली आङे.तो बिहारचा राहणारा आहे.रेखा दुग्गल यांच्या दोन्ही मुली परदेशात असतात.रेखा दुग्गल यांचे पती देखील पत्रकार होते.त्यांनी काही न्यूज एजन्सीत संपादक म्हणून काम केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here