दिल्लीत दोन पत्रकारांवर हल्ले

0
858

राजधानी दिल्लीत दोन पत्रकारांवर हल्ले केले गेले.उत्तर -पुर्व जिल्हयातील वेलकम भागात पोलिसांनी आपल्या वर्दीची ऐट पत्रकाराला दाखविली.बाबरपूर येथील अतिक्रमण विभागाच्या कारवाईचे कव्हरेज करणारे जागरणचे सचिन त्रिवेदी यांना पोलिसांनी रोखले.एवढेच नव्हे तर सचिनला धक्काबुक्की देखील केली.त्यांना पीआयकडे नेले गेले तेथे पोलिस अधिकाऱ्याने त्रिवेदीवर महिलांची छेडछाड आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून आत टाकण्याची धमकी दिली.त्यानंतर त्याच्याकडंच ओळखपत्र काढून घेतलं गेलं.त्याला गाडीत घालून दोन तास इकडं-तिकडं फिरविलं गेलं.आणि नंतर या भागात दिसता कामा नये अशी धमकी देऊन सोडले.या प्रकरणाची वरिष्ठाकडं तक्रार केली गेलीय.
अन्य एका घटनेत एका खासगी वाहिनीचा पत्रकार संदीप चौव्हानला मारहाण झाल्याचे प्रकरण समोर आलंय.बिल्डरच्या काही लोकांनी संदीपला मारहाण केल्याची तक्रार समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here