दिलीप सपाटे यांचा 25 ला केजला सत्कार 

0
949

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप सपाटे यांचा सत्कार केज येथे करण्यात येणार आहे.मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न केज तालुका पत्रकार संघाच्यावतीने हा सत्कार सोहळा होत असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख तसेच विश्‍वस्त किरण नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होत आहे.दिलीप सपाटे यांचं आपल्या जन्मभूमीत कौतूक होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

दिलीप सपाटे हे केजचे भूमीपूत्र आहेत.केज तालुक्यातील एका छोटया खेडयातून आलेल्या सपाटे यांनी आपल्या कर्तत्वानं मुंबईतील पत्रकारितेत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.अजातशत्रू पत्रकार म्हणून ओळख असणार्‍या सपाटे यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोठ्या फरकानं विजय संपादन केला.त्याचा आनंद केजच नव्हे तर बीड जिल्हयातील तमाम पत्रकारांना आहे.

Click here to Reply or Forward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here