दिलीप कांबळे यांचा परिषद आणि

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे निषेध

दिलीप कांबळे पत्रकारांवर घसरले,जोडयानं मारम्याची भाषा

मुंबईः पत्रकार पैसे घेऊन कुणाबद्दलही काहीही लिहितात,अशा पत्रकारांना बुटानं मारलं पाहिजे असे वक्तव्य करून दिलीप कांबळे यांनी सत्ता डोक्यात गेल्याचे दाखवून दिले आहे.त्यांनी केलेल्या वक्तव्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेने तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.दिलीप कांबळे यांनी के लेल्या वक्त्यव्याबद्दल राज्यातील पत्रकारांची जाहीर माफी मागावी तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  परिषदेनेने म्हटले आहे की,काही दिवसांपुर्वी दिलीप कांबळे यांनी ब्राह्मणांबद्दल लातूर येथे अवमानास्पद वक्तव्य केले होते.त्याला आक्षेप घेतल्यानंतर त्यानी माफी मागून हे प्रकरण मिटविले.आता त्यांनी हिंगोली येथे शिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलताना पत्रकारांंना जोड्यानं मारण्याची भाषा केली आहे.शिवार संवाद यात्रा हे ढोंग आहे,तमाश्या आहे अशा बातम्या आज काही  वर्तमानपत्रांनी दिल्या आहेत,त्या दिलीप कांबळे यांना आवडलेल्या नसल्यानं त्यांनी पत्रकारांबद्दल मुक्तफळे उधळली आहेत.हिंगोलीत तर ते बोललेच पण वाहिन्यावर बोलताना देखील त्यांची अरेरावी कमी झालेली नव्हती.पत्रकार ब्ल्रकमेल करतात,समाजात तेढ निर्माण करतात असेही त्यांनी म्हटलेले आहे.त्यांची एकूण वक्तव्य बघता सत्ता त्यांच्या डोक्यात गेली असून त्यांची जीभ सैल सुटल्याचे स्पष्ट दिसत आहे.त्यांच्या या वक्व्याचा निषेध कऱण्यात येत आहे.-

दिलीप कांबळें यांची मुक्ताफळे

– एकेकाला बुटानं मारलं पाहिजे.

– पत्रकार लई बेकार

– मी दांडक्यावाल्यांना घाबरत नाही अन त्या पेपरवाल्यांनाही घाबरत नाही

-पत्रकारांच्या जिवावर राजकारण चालतं का

– आम्ही कार्यक्रम घेतले,सत्कार घेतले तर यांच्या पोटात का दुखतं

– मी लई डेंजर माणूस हाय

– पत्रकार कोणाचेच नसतात,ते आज आपले तर उध्या दुसर्‍याचे असतात

– पाकीट मिळालं की पत्रकार कुणाबद्दलही लिहितात

– ते दर्डा लई साजूक आहेत का

– पत्रकार ब्ल्रॅकमेल करतात

– पत्रकार समाजात तेढ निर्माण करतात

वगैरे वगैरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here