नवी दिल्लीः पत्रकारांबद्दलची सर्वस्तरावर उदासिनता दिसते.या पार्श्‍वभूमीवर राहूल गांधी यांनी एका दुर्घटेत जखमी झालेल्या पत्रकाराला आपल्या गाडीमध्ये घालून नजिकच्या हॉस्पिटलमध्ये नेलं.राजेंद्र व्यास असं या पत्रकाराचं नाव आहे.
एका अपघातात जखमी झालेले व्यास रस्त्याच्या कडेला पडले होते.कॉग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना हे समजल्यानंतर त्यांनी व्यास यांना गाडीत बसविले,त्यांचे रक्त पुसले आणि त्यांनी व्यास यांना रूग्णालयात पोहचविले.पत्रकार आणि सामांन्यजनांबद्दलचा हा आपलेपणा सर्वस्तरातून दिसायला हवा.भाजपनं या घटनेची नौटंकी अशा शब्दात निर्भत्सना केली आहे.असेल नौटंकी पण त्यामुळं एका पत्रकाराला लगेच उपचार मिळाले असतील तर अशा नौटंकीचंही आम्ही स्वागत करतो.त्यामुळं राहूल गांधी यांना धन्यवाद द्यावे लागतील .थॅक्स राहूल गांधी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here