Saturday, May 15, 2021

‘तो’ पत्रकार आहे म्हणून…

‘तो’ पत्रकार आहे म्हणून…

परभणी जिल्हयातील पूर्णा  येथील पत्रकार दिनेश चौधरी यांच्यावर एका राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यानं अॅसिड हल्ला करून त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला.त्याबद्दलचा गुन्हा दाखल झाला मात्र खरा छळ सुरू झाला त्यानंतर.दिनेशवर विनयभंगाचे,खंडणीचे असे तीन-चार खोटे  गुन्हे दाखल करून त्याचं जगणं असहय करून टाकलं गेलं आहे. अॅ्ॅसिड ह्ल्ला झाल्यानंतर दिनेश चौधरीला  ज्या दिव्यातून जावं लागलं तो सारा प्रकार थरकाप उडविणारा,संताप वाढविणारा आणि चिंताजनकही आहे. ग्रामीण भागात पत्रकार कोणत्या स्थितीत काम करतात याचं उदाहरण म्हणून या घटनेकडं पाहता येईल.मराठी पत्रकार परिषदेेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकणीर् यांच्यावर दाखल झालेल्या खोटया तक्रारीनंतर दिनेश चौधरी यांनी आपलाही अनुभव शेअर केला आहे.तो येथे त्यांच्याच शब्दात देत आहे.पत्रकार आहे म्हणून दिनेशला काय काय सहन करावं लागत आहे त्याची ही कथा..त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

!! लोकशाही चौथ्या आधारस्तंभावर दहशत राजकीय गुंडांची..?

सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी स्वतःच्या व स्वतःच्या परिवाराच्या जिवीताची पर्वा नकरता निर्भिड पञकारीता करित असतांना केवळ सत्याची कास धरुन वृत्तांकन करणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनीधींना राजकीय षंढ-गुंड, गुटखा माफिया,भुमाफिया,मटका माफिया,गौण-खनिज माफिया,अमली पदार्थ तस्कर,आदिंच्या जिवघेण्या हल्ल्यांना सामोरे जावे लागते सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी आपली कलम झिजवत असतांना आपले व आपल्या परिवारांचे भविष्य कसे उध्वस्त होते याचा प्रत्यक्ष अनुभव मी स्वतः घेत आहे
माझ्या जिवनात दहशतीचे आगमन झाले दि.12 मार्च 2013 रोजी निर्भिड वृत्तांकन करित असतांना वृत्तपञ क्षेञातील निम हकीम भेकड साथिदार कसा घात करतात याचा भयंकर अनुभव मी घेतला दि.5 फेब्रुवारी 2013 रोजी मी दैनिक सोलापूर तरुण भारत या वृत्तपञात गुटखा तस्करी संदर्भात प्रकाशित केलेल्या वृत्तांची कॉफी अश्याच एका सोबत रहाणा-या निम हकीमाने स्वतःच्या नावाने एका आघाडीच्या वर्तमान पञात दि.12 मार्च 2013 रोजी प्रकाशित करुन गुटखा तस्करां समोर शरनागती पत्करुन सदरिल वृत्तही मिच प्रकाशित केल्याचे सांगितल्याने 12 मार्च 2013 रोजी रात्री 11;30 वाजेच्या सुमारास समाजकंटक प्रवृत्तीच्या गुटखा तस्कर व त्याच्या गुंड साथिदारांनी माझ्या सह माझ्या परिवारावर भयंकर असा ‘ॲसिड हल्ला’ करुन वृत्तपञ क्षेञावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला सदरील ॲसिड हल्ल्यात माझ्या परिवारातील तिन लोक गंभीर जख्मी झाले या ॲसिड हल्ल्याच्या प्रचंड दहशतीतुन अध्यापही माझे कुटुंब सावरलेले नाही म्हणतात ना ‘ज्याचे जळते त्याला कळते’ या गंभीर घटने संदर्भात मी दाखल केलेला गुन्हा वापस घ्यावा या करिता गुटखा तस्कर व समाजकंटक प्रवृत्तीच्या षंडाने खंडणी, विनयभंगा सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हें भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरुन माझ्या व माझ्या सोबत रहाणा-या वृत्तपञ प्रतिनीधी साथिदारांवर दाखल करुन वृत्तपत्र क्षेञावर प्रचंड एकछञी दहशत निर्माण केली या दहशतीला घाबरुन काहींनी शरणागती पत्करली तर काहींनी आपले हात……..यामुळे सदरील गुंड गुटखा तस्कराची हिंम्मत इतकी वाढली कि याने स्वतःची ‘मुंबई झोपडपट्टी दादा कायद्यातुन सुटका करुन घेण्याकरीता जिल्हाधिकारी परभणी यांना दिलेल्या पाच ते सहा पाणी पञात मुर्खपणाची हद्दपार करुन माझा काही वर्षापूर्वी नांदेड आणि पुर्णा येथे मस्जिद मध्ये झालेल्या ‘बाँम्ब स्फोटा’मध्ये हात असल्याचा उल्लेख करुन स्वतःचा मुर्खपणा सिध्द केला सामान्य जनतेच्या न्याय हक्का साठी लेखनी झिजवीणा-या निर्भीड वृत्तपञ प्रतिनिधींना भयंकर मनस्ताप सहन तर करावाच लागतो प्रसंगी स्वतःचा जिव सुध्दा गमवावा लागतो जे लोक पञकारांनी दिलेल्या प्रसिध्दी मुळे मोठे होतात तेच ‘एहसान फरामोश’ कालांतराने स्वतःच्या काळ्या कारोभाराला तसेच गुंडसाथी दारांच्या बचावा करिता पञकारांचे वैरी दुश्मण होतात हे भयंकर दुःख येते निर्भिड पञकार व त्यांच्या कुटुंबाच्या वाट्याला असाच प्रत्यय नुकताच नांदेड चे जेष्ट व श्रेष्ठ पञकार श्री.संजिव कुलकर्णी यांच्या सोबत हीं घडला त्यांच्या विरोधात हीं अश्याच प्रकारे ॲक्ट्रॉसीटी ॲक्ट कायद्या अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करुन पुन्हा एकदा वृत्तपञ क्षेञावर दहशत निर्माण करण्याचा प्रकार मराठवाड्यात घडला परंतू या क्षेञात केवळ तत्वभ्रष्ट राजकारणी,भ्रष्ट अधिकारी,गुंड-माफिया,चोर,तस्कर आदिंची दलाली भडवेगीरी करुन केवळ पोटभरण्या साठी या क्षेञात वावरणारे काही ‘भांड’ श्री.कुलकर्णी यांच्या सारख्या जेष्ठ पञकारालाही दोष देऊन दहशतवादी प्रवृत्तीचा उदों उदों करतांना दिसत आहेत ही फार मोठी शोकांतीकाच म्हणावी लागेल परंतु सत्य ते सत्यच असते माझ्या व माझ्या कुटुंबावर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या घटने नंतर महाराष्ट्रातील सर्वच पञकार बांधवांनी तसेच परभणी-नांदेड येथील जेष्ट-श्रेष्ठ पञकार बंधुंनी तसेच ॲसिड हल्ल्यात गंभीर जख्मी होऊन प्रचंड भेदरलेल्या माझ्या कुटुंबाच्या डोक्यावर मायेने हात ठेऊन धिर देणा-या आदरणीय एस.एम.देशमुख सर आदरणीय किरण नाईक सर दैनिक सोलापूर भारत चे संस्थापक आदरणीय श्री.पेठे सर यांचे माझ्या कुटुंबावर अनंत उपकार आहेत यांनी मला दहशतवादी प्रवृत्ती विरोधात लढण्याची हिंम्मत दिली परंतु वर्तमानपत्र क्षेञांचे फार मोठे दुर्दैव्य म्हणावे लागेल कि या क्षेञात निर्लज्ज पणे दहशतवादी प्रवृत्तीचे समर्थन करणारी पोटभरु व भेकड प्रवृत्ती जोमाने वाढत असल्याने ‘घर का भेदी लंका ढायें अशी अवस्था लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्तपञ क्षेञाची झाली आहें…………..
दिनेश चौधरी (रणजीत)
प्रतिनिधी दैनिक सोलापुर तरुन भारत ता.पुर्णा जि.परभणी

Related Articles

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,960FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

पुन्हा तोंडाला पाने पुसली

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पुसली मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होईल अशी जोरदार चर्चा मुंबईत होती पण...
error: Content is protected !!