कानपूरमध्ये पत्रकाराची हत्त्या

0
1373

ते आले,पत्रकारावर गोळ्या झाडून फरार झाले..

पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत.22 नोव्हेंबर रोजी त्रिपुरात सुदीप भौमिक यांच्या झालेल्या हत्येची घटना ताजी असतानाच थोडयावेळापुर्वी उत्तर प्रदेशात कानपूरमधील बिल्होर पोलीस ठाण्याअंतर्गत एका पत्रकाराची हत्त्या करण्यात आली.बाईकवरून आलेल्या दोघांनी या पत्रकाराला गोळ्या घातल्या.जखमी अवस्थेत त्याला रूग्णालायात नेले असता तेथे मृत जाहीर करण्यात आले.नवीनकुमार श्रीवास्तव असं या पत्रकाराचे नाव असून ते हिंदुस्थान या वर्तमानपत्रात कार्यरत होते.नवीनवर गोळ्या झाडल्या नंतर मारेकरी सुसाट वेगाने पसार झाले.बिल्होर हे शहर कानपूरपासून 60 किलो मिटर अंतरावर आहे.श्रीवास्तव मार्केटमध्ये असलेल्या आपल्या होजिअरीच्या दुकानात बसलेले असताना त्यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या.या प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली असून मोठया प्रमाणात मारेकर्‍यांचा शोध घेतला जात आहे.ही हत्त्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी अशी चर्चा आहे.

5 सप्टेंबर रोजी गौरी लंकेश यांची बेंगुळुरूमध्ये हत्या झाली होती.21 नोव्हेंबर रोजी त्रिपुरात सुदीप दत्ता भौमिक यांची त्रिपुरात हत्त्या झाली होती,तर 20 सप्बेंटर रोजी शंतनू भौमिक या पत्रकाराची हत्त्या झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here