तेहलका मॅगझिनचे माजी संपादक तरूण तेजपाल यांना आज सवोच्च न्यायालयाने कायम जामिन मंजूर केला आहे.त्यासाठी काही अटी लावण्यात आल्या आहेत.या अटीचे तेजपाल यांनी उल्लंघन केले तर जामिन रद्द करण्याचा आदेशही न्यायालायने दिला आहे.तेजपाल प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने तातडीने पूणर् करावी असा आदेशही न्यायालयाने दिलाय.तेजपाल यांनी आपला पासपोटर् जमा करावा असा आदेशही देण्यात आला आहे,
तेजपाल गेली सहा महिने तुरूंगात आहे.त्यांच्यावरील खटल्याची सुनावणी पूणर् व्हायला आणखी किती दिवस लागतील सांगता येत नाही अशा स्थितीत त्यांना तुरूंगात ठेवणे योग्य नसल्याचे निरीक्षण न्यायालायने नोंदविले आहे.१९ मे रोजी तेजपाल यांच्या आईचे निधन झाले होते.त्यामुळे त्यांना जामिन देण्यात आला होता.त्यानंतर जामिनाची मुदत १ जुलैपयर्त वाढविण्यात आला होता.त्याची मुदत आज संपत असताना तेजपाल यांनी कायम जामिनासाठी अजर् केला होता.तो मंजूर केला गेला.मागिल वषीर् गोव्यात मासिकाच्या झालेल्या एका कायर्क्रमाच्या वेळेस आपल्या सहकारी महिलेचा लैगिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती.

LEAVE A REPLY